Lok Sabha Election: भाजप जिंकल्यानंतर आम्ही मुस्लिम आरक्षण रद्द करू, अमित शाह यांचे मोठे विधान

Amit Shah On Muslim Reservation: तेलंगणा येथील सभेला संबोधित करताना अमित शहा यांनी मोठे विधान केले. त्यांनी सांगितले की, 'या निवडणुकीत भाजप जिंकला तर मुस्लिम आरक्षण रद्द करू. तसंच, एससी, एसटी आणि ओबीसी समाजाचे आरक्षण वाढवू.'
Amit Shah On Muslim Reservation
Amit Shah On Muslim ReservationSaam Tv

मुस्लिम आरक्षणावरून (Muslim Reservation) सध्या संपूर्ण देशातील वातावरण चांगले तापले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा चांगलाच उचलून धरला जात आहे. या मुद्द्यावरून भाजप (BJP) सातत्याने काँग्रेसवर (Congress) निशाणा साधत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 'या निवडणुकीत भाजप जिंकला तर मुस्लिम आरक्षण रद्द करू. तसंच, एससी, एसटी आणि ओबीसी समाजाचे आरक्षण वाढवू.', असे विधान त्यांनी केले आहे.

गुरूवारी तेलंगणातील रायगिरी येथे अमित शहा यांची सभा झाली. भोंगीर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये त्यांनी मुस्लिम आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केले. 'भाजप सत्तेत आले तर आम्ही मुस्लिम आरक्षण रद्द करू आणि एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणात वाढ करू.', असे त्यांनी सांगितले. याचसोबत त्यांनी काँग्रेसवर देखील निशाणा साधला. 'या लोकांना (बीआरएस, ओवेसी आणि काँग्रेस) तेलंगणामध्ये शरिया आणि कुराणाच्या आधारे सरकार चालवायचे आहे.', असा आरोप त्यांनी केला.

Amit Shah On Muslim Reservation
PM Narendra Modi : काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीएमध्ये यावं; भरसभेतून PM मोदींची शरद पवार आणि ठाकरेंना ऑफर

अमित शहा असेही म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली १० वर्षे एकदिलाने या देशाचे नेतृत्व करत आहेत. पण त्यांनी आरक्षण संपवले नाही. उलट मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण देऊन काँग्रेस पक्षाने एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणावर दरोडा घातला आहे.' तसंच, '२०१९ मध्ये तेलंगणच्या जनतेने आम्हाला चार जागा दिल्या. यावेळी आम्ही तेलंगणात लोकसभेच्या १० पेक्षा जास्त जागा जिंकू. तेलंगणातील ही दुहेरी अंकी धावसंख्या पंतप्रधान मोदींना ४०० जागांच्या पुढे नेईल. भाजप जिंकला तर मुस्लिम आरक्षण संपवू आणि एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण वाढवू.', असे विधान त्यांनी केले आहे.

Amit Shah On Muslim Reservation
Pune Loksabha: रविंद्र धंगेकरांच्या नावाने साडीवाटप करणे भोवले, भरारी पथकाकडून एकावर गुन्हा दाखल

अमित शहा यांनी पुढे असे देखील सांगितले की, '२०२४ च्या निवडणुका राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी यांच्यात आहेत. ही निवडणूक 'विकासाला मत द्या' आणि 'जिहादला मत द्या' यांच्यात आहे. ही निवडणूक पंतप्रधान मोदींची 'भारतीय गॅरेंटी' आणि राहुल गांधींची 'चीनी गॅरेंटी' यांच्यामध्ये आहे.', असे वक्तव्य करत त्यांनी पु्न्हा एकदा काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

Amit Shah On Muslim Reservation
Mani Shankar Aiyar: पाकिस्तानला सन्मान द्या, अन्यथा बॉम्ब फोडतील; कॉंग्रेस नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com