nasa scientists successfully grew potatoes in moon-like soil AI Image
देश विदेश

NASA Research : चंद्रावरही होणार बटाट्याची शेती, शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना मोठं यश, हा प्रयोग नेमका आहे तरी काय?

Potatoes On The Moon NASA Research : चंद्रावर बटाटे उगवणे शक्य होणार? नासाच्या पाठिंब्याने शास्त्रज्ञांनी चंद्रासारख्या मातीत यशस्वीपणे बटाट्याचे पीक घेतले. जाणून घ्या संशोधनाची संपूर्ण माहिती.

Alisha Khedekar

अनेकदा आपण कंटाळा आला की सहज म्हणतो पृथ्वी सोडून कुठेतरी लांब चंद्रावर जायचं आहे. तसेच संशोधनासाठी अंतराळवीर चंद्रावर जातात. मात्र चंद्रावर गेल्यावर खायचं काय आणि प्यायचं काय ? हा मोठा प्रश्न. पण तुम्हाला माहिती आहे का? आता चंद्रावरसुद्धा बटाटे उगवू शकतात. नासाने केलेल्या संशोधनातून हे सिद्ध झालं आहे. अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी चंद्रावर असलेल्या मातीसारखे काही नमुने घेऊन त्यामध्ये यशस्वीरीत्या बटाट्याचं पीक घेतलं. या संशोधनाचा मुख्य उद्देश म्हणजे चंद्रावर जाणाऱ्या अंतराळवीरांना भविष्यात अन्न शोधण्याची कोणतीही गरज भासू नये, तसेच पृथ्वीवरून अन्न घेऊन जाणे सोपे पडावे.

चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या मातीला शास्त्रीय भाषेत 'लुनार लेगोलीथ' म्हटले जाते. हे लाखो किंवा अब्जावधी वर्षांमध्ये उल्कापातामुळे तयार झालेले खडक आणि धुळीचे मिश्रण आहे. त्यात लहान, तीक्ष्ण कण देखील असतात. परंतु या मातीमध्ये पृथ्वीवरील मातीप्रमाणे सेंद्रिय पदार्थ आणि आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असते. संशोधकांनी तयार केलेल्या मातीमध्ये गांडूळ खत नावाचे एक विशेष सेंद्रिय खत मिसळले. हे खत भारतात स्थानिक खत म्हणून वापरले जाते.

संशोधनातून असे दिसून आले की, या खताशिवाय चंद्राच्या मातीत बटाटे व्यवस्थित वाढत नाहीत. अशा वनस्पतींना मुळे किंवा बटाटे येत नाहीत. तसेच जेव्हा शास्त्रज्ञांनी मातीत ५% गांडूळ खत मिसळले, तेव्हा वनस्पतींना मुळे आणि बटाटे येऊ लागले. ३०% गांडूळ खत आणि ७०% चंद्राची माती यांचे मिश्रण केल्यानंतर योग्य बटाटे उगवण्यासाठी योग्य माती तयार झाली. या मिश्रणात पिकवलेल्या बटाटे चांगल्या मातीत पिकवलेल्या बटाट्यांसारखेच असल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या संशोधनाला अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने पाठिंबा दिला होता. शास्त्रज्ञांनी हा प्रयोग 'मोडोक' नावाच्या बटाट्याच्या जातीवर प्रयोग केला, जी लवकर पिकणारी, लाल साल आणि पांढरा गर असलेली जात आहे. महत्त्वाचं म्हणजे हे बटाटे खाण्याजोगे असून ते पौष्टिक आणि सुरक्षित असल्याचे सुद्धा संशोधनात सिद्ध झाले.

या संशोधनाचे नेतृत्व करणारे ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीचे वनस्पती जीवशास्त्रज्ञ आयमेरिक गोयर यांच्या मते, बटाटे कमी जागेत इतर अनेक पिकांपेक्षा जास्त कॅलरीज देऊ शकतात. त्यामध्ये केळ्यांपेक्षा जास्त पोटॅशियम, तसेच व्हिटॅमिन सी आणि भरपूर प्रथिने असतात. बटाट्यांमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहण्यासही मदत होते. याचा अर्थ असा की, चंद्रावर कमी जागेत पिके घेतली जाऊ शकतात, ज्यामुळे अंतराळवीरांना पुरेसे पोषण मिळू शकेल. शास्त्रज्ञांनी हे बटाटे अशा ठिकाणी वाढवले, जिथे दिवसा तापमान सुमारे २२ अंश सेल्सिअस आणि रात्री १८ अंश सेल्सिअस राखले जात होते. या रोपांना सूर्यप्रकाश तसेच कृत्रिम प्रकाशही पुरवण्यात आला.

या संशोधनाचे नेतृत्व करणारे ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीचे वनस्पती जीवशास्त्रज्ञ आयमेरिक गोयर यांच्या मते, बटाटे कमी जागेत इतर अनेक पिकांपेक्षा जास्त कॅलरीज देऊ शकतात. त्यामध्ये केळ्यांपेक्षा जास्त पोटॅशियम, तसेच व्हिटॅमिन सी आणि भरपूर प्रथिने असतात. बटाट्यांमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहण्यासही मदत होते. याचा अर्थ असा की, चंद्रावर कमी जागेत पिके घेतली जाऊ शकतात, ज्यामुळे अंतराळवीरांना पुरेसे पोषण मिळू शकेल. शास्त्रज्ञांनी हे बटाटे अशा ठिकाणी वाढवले, जिथे दिवसा तापमान सुमारे २२ अंश सेल्सिअस आणि रात्री १८ अंश सेल्सिअस राखले जात होते. या रोपांना सूर्यप्रकाश तसेच कृत्रिम प्रकाशही पुरवण्यात आला.

अमेरिका आणि चीन येत्या काही वर्षांत चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याची तयारी करत आहेत. त्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरणार आहे. दरम्यान गोयर यांनी सांगितले की, चंद्रावर भविष्यात बटाट्याचे चिप्स, फ्रेंच फ्राईज, बेक्ड पोटॅटो, पोटॅटो टिक्की आणि सूप यांसारखे पदार्थ बनवता येऊ शकतात. त्यामुळे आता तुम्ही सुद्धा चंद्रावर जाण्याची स्वप्ने बघत असाल आणि खायचा प्यायचा प्रश्न पडत असेल तर चिंता सोडा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samantha Ruth Prabhu: समांथा रुथ प्रभू वयाच्या ३९ व्या वर्षी झाली आई; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

Maharashtra News Live Update: काँग्रेस लागली लोकभेच्या तयारीला

सतत तक्रार करणाऱ्यांच्या मनात नेमकं काय सुरू असतं? मानसशास्त्र काय सांगतं?

टीम इंडियातून सिराज 'आऊट'! क्रिकेटच्या मैदानात राजकारणाची एण्ट्री; काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली

किचनच्या ओट्यावर चुकूनही ठेवू नका 5 वस्तू, आरोग्य, सुख- समृद्धीवर होईल परिणाम

SCROLL FOR NEXT