American Presidential Election 2024 Saam Digital
देश विदेश

American Presidential Election 2024: मी सध्या भयग्रस्त, अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी का व्यक्त केली चिंता? जाणून घ्या

American Presidential Election 2024 News: अमेरिकेत या वर्षी सार्वत्रिक निवडणुका होत असून यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. लवकरच अमेरिकन जनता उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहे. दरम्यान अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी, डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परत येऊ शकतात याची त्यांना खूप भीती वाटते, असं म्हटलं आहे.

Sandeep Gawade

American Presidential Election 2024

'कोणतीही लढाई जिंकण्याचे दोन मार्ग असतात, एकतर तुमचा कोणी विरोधक नाही किंवा तुम्हाला भविष्याची भीती वाटते. या भीतीतूनच आपल्याला अशी शक्ती मिळते आणि आपण आपल्या भविष्याची कल्पना करतो आणि नंतर ते बदलण्याचा प्रयत्न करतो.'असं मत अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी व्यक्त केलं आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या आयोवा कॉकसमध्ये विजय मिळवल्यानंतर हॅरिस यांनी ही टिप्पणी केली आहे. या विजयानंतर ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे सर्वाधिक लोकप्रिय उमेदवार बनले आहेत.

अमेरिकेत या वर्षी सार्वत्रिक निवडणुका होत असून यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. लवकरच अमेरिकन जनता उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहे. दरम्यान अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी, डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परत येऊ शकतात याची त्यांना खूप भीती वाटते. त्यामुळे सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असं आवाहन कमला हॅरिस यांनी डेमोक्रॅट पक्षाच्या समर्थकांना केलं.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आपल्या मुलांच्या आयुष्याच्या चिंतेने आपल्या झोप लागत नाही. तशीच चिंता आपल्या देशाविषयी असली पाहिजे. आपल्या देशाचं काय होणार याची भीती आपल्या मनात कायम राहिली पाहिजे. मलाही एका गोष्टीची भीती सारखी सतावतेय की डोनाल्ड ट्रम्प जर व्हाईट हाऊसमध्ये परत आले तर काय होईल याची. कारण अमेरिकेच्या लोकशाहीसाठी ते निश्चितच चांगलं नसेल. आपल्या सर्वांसाठी याची चिंता वाटली पाहिजे. म्हणूनच पक्षाच्या प्रचारासाठी देशभर दौरे करत असल्याच त्या म्हणाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

SCROLL FOR NEXT