American Airlines Catch Fire Saam Tv
देश विदेश

American Airlines: १७८ प्रवासी असलेल्या विमानाला भीषण आग; लँडिंग करताच फ्लाइटने घेतला पेट

American Airlines Catch Fire: अमेरिकेच्या एका विमानाला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. या विमानात १७८ प्रवाशी होते.

Bharat Jadhav

अमेरिकेच्या डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या फ्लाइट 1006 ला भीषण आग लागली. गुरुवारी संध्याकाळी हे विमान विमानतळावर उतरल्यानंतर त्याच्या इंजिनने पेट घेतला. या विमानात १७८ प्रवाशांसह ६ क्रू मेंबर होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान डॅलस-फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणार होते, परंतु इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ते डेन्व्हरला वळवण्यात आलं. विमान सुखरूप उतरले मात्र C-38 गेटवर उभे राहिल्यानंतर इंजिनमधून धूर निघू लागला, त्यामुळे प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले.

विमानतळावरील अधिकारी आणि अमेरिकन एअरलाइन्सच्या निवेदनानुसार, विमान एअरपोर्टवर उतरल्यानंतर टरमॅकवर धूर उडू लागला. त्यानंतर आग लागल्याची माहिती झाली. त्यावेळी विमानात १७८ प्रवाशी आणि ६ क्रू मेंबर होते. विमानाला आग लागल्याच समजताच विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आणि टर्मिनलवर नेण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT