Donald Trump Warn Iran saam tv
देश विदेश

US- Iran War: 'होर्मुझमधील नाकेबंदी उठवा'; ट्रम्पची इराणला 48 तासांची डेडलाईन

Donald Trump Warn Iran : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यावरून अमेरिकेनं इराणला धमकी दिलीय. त्यामुळे 48 तासांत इराण- अमेरिका संघर्ष कोणत्या दिशेने जाणार? इराणनं अमेरिकेला काय प्रत्युत्तर दिलयं ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Girish Nikam

अमेरिका- इराणमधील संघर्षाला आता महिना उलटून गेलाय. मात्र युद्धविरामाची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. एकमेकांवर हल्ले सुरुच आहेत. अमेरिकेचे दोन लढाऊ विमान इराणनं उद्धवस्त केलीयेत. अमेरिकतील दोन वैमानिकांनाही इराणनं कैद केलंय. त्यातच होर्मुझ सामुद्रधुनीवरून ट्रम्प पुन्हा संतापलेत. ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा देताना नेमकं काय म्हटलयं, पाहूयात.

“मी इराणला सांगितले होते की, करार करा किंवा होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा. यासाठी त्यांना दहा दिवसांची मुदत दिली होती. ही वेळ 6 एप्रिलला संपत आहे. त्यामुळे होर्मुझची नाकेबंदी उठवा नाहीतर 48 तासांत इराणवर नरकासमान आपत्ती कोसळेल." दुसरीकडे ट्रम्प यांच्या या धमकीला इराणनेही तितक्याच जहाल भाषेत उत्तर दिलयं. 'खातम अल-अनबिया' सेंट्रल हेडक्वार्टरचे प्रवक्ते इब्राहिम जोल्फाघारी यांनी ट्रम्प यांना काय प्रत्युत्तर दिलं पाहूयात.

अमेरिकेने इराणला हरवण्याचा केलेला विचार हा केवळ एक भ्रम आहे. या प्रयत्नात अमेरिका स्वतःच एका न संपणाऱ्या दलदलीत अडकली जाईल. इराणने आधीच आपल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून इस्रायल आणि अमेरिकेशी संबंधित अनेक तळांना लक्ष्य केले आहे. गरज पडल्यास ही कारवाई आणखी तीव्र केली जाईल.

दरम्यान ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले करण्याची आणि इराणला 'पाषाण युगात' पाठवण्याची भाषा केल्यानं इराणही आक्रमक झालीय. आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी इराण कोणत्याही थराला जाण्यास तयार असल्याचं आणि होर्मुझ खुला करण्याच्या कोणत्याही दबावापुढे इराण झुकणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलयं. मात्र होर्मुझवरून अमेरिका आक्रमक का झालीय. पाहूयात.

होर्मुझचा जलमार्ग ही जगातील अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी मानली जाते. कारण याच मार्गाने जगातील तब्बल 30 टक्के तेल वाहतूक होते. दररोज 2 कोटीपेक्षा जास्त बॅरल तेलवाहतूक होर्मुझ जलमार्गाने होते. सौदी अरेबिया, इराण, यूएई, कुवेत आणि इराकसारख्या मोठ्या तेल उत्पादक देशांसाठी निर्यातीचा हाच मार्ग आहे.तर भारतही सर्वाधिक कच्चं तेल याच मार्गाने आयात करतो. त्यामुळे इराणनं हा मार्ग रोखल्यानं कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडतील. ज्यामुळे भारत, युरोप आणि अमेरिकेसह संपूर्ण जगाचे आर्थिक कंबरडे मोडू शकते.

त्यामुळेच अमेरिका इराणवर हा मार्ग खुला करण्यासाठी दबाव टाकत आहे. मात्र इराण आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे होर्मुझवरून पेटलेली वादाची ठिणगी दोन देशापूरती मर्यादीत न राहता तिसऱ्या महायुद्धाची नांदी ठरू शकते. त्यामुळे पुढच्या 48 तासांत इराण नाकेबंदी उठवणार की ट्रम्प इराणवर मोठा हल्ला करून इराणची नाकेबंदी करणार? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 'या' वाहनांना बंदी; वाहतूक कधी सुरू होणार? महत्वाची अपडेट समोर

AI खातोय भारतीयांच्या नोकऱ्या, AIमुळे जगावर बेरोजगारीचं सावट

Watermelon Eating: रात्री कलिंगड खाल्ल्याने विषबाधा होते? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

MI vs SRH: हेड-क्लासेनच्या वादळी खेळीनं मुंबई इंडियन्सला नमवलं; घरच्या मैदानात MI लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics: महायुतीत भाजपला कडू का नकोत? प्रहारच्या विलिनीकरणाला भाजपचा विरोध?

SCROLL FOR NEXT