America Texas School Shooting Saam TV
देश विदेश

अमेरिकेतील टेक्सासमध्ये अंदाधुंद गोळीबार; 18 विद्यार्थ्यांसह एकूण 21 जणांचा मृत्यू

Texas School Shooting : या गोळीबारात आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळतेय

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : अमेरिकेतील (America) टेक्सास (Texas) शहरात एक भयंकर घटना घडली आहे. येथील एका शालेत 18 वर्षीय तरुण हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केलाय. या गोळीबारात (Shooting) आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 19 विद्यार्थी, 2 शिक्षक, हल्लेखोर आणि त्याच्या आजीचा समावेश आहे. विशेष म्हणजे म्हणजे हल्लेखोरही स्वत: ठार झाला असून तो त्याच हायस्कूलचा विद्यार्थी होता. या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी शोक व्यक्त केला आहे. (America Texas Shooting)

नेमकं काय घडलं?

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'रॉब एलिमेंट्री स्कूल' असं गोळीबार झालेल्या शाळेचं नाव असून हल्लेखोर तरुण याच शाळेचा माजी विद्यार्थी आहे. शाळेतील विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याआधी हल्लेखोराने स्वत: च्या आजीलाही गोळ्या घातल्या होत्या. गोळी लागल्याने आजीला सॅन अँटोनियो येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथं आजीवर उपचार सुरू असताना त्याने पळ काढला. यानंतर तो शाळेत पोहोचला आणि विद्यार्थ्यांवर गोळीबार केला.

पोलिसांच्या कारवाईत हल्लेखोरही ठार

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतील विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याआधी तरुणाने आपली गाडी शाळेबाहेरच लावली होती. त्यानंतर शाळेत घुसून अंदाधुंद गोळीबार सुरू केला. हल्लेखोराजवळ एक हँडगनही आढळली आहे. हल्लेखोराने शाळेत प्रवेश करण्यापूर्वी बुलेटप्रूफ जॅकेट घातले होते. यानंतर त्याने शाळेतील वेगवेगळ्या वर्गात जाऊन गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात आतापर्यंत एकूण 21 जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत 18 वर्षीय हल्लेखोरही ठार झाला आहे.

जो बायडेन यांनी व्यक्त केला शोक

दरम्यान, या थरारक घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शोक व्यक्त केला. 'आपण कधीपर्यंत देवाच्या नावावर बंदूक घेणार आहोत, हे स्वत:ला विचारणं गरजेचं आहे. जे आई-वडील आता कधीही आपल्या मुलांना पाहू शकणार नाहीत, त्यांचा विचार करणं गरजेचं आहे. आता कडक कारवाई करण्याची वेळ आली असून जे लोक कायदा मोडून हातात बंदूक घेतात, त्यांना आम्ही माफ करणार नाही,' असं बायडेन यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mehandi Designs: दिवाळी पाडवानिमित्त हातावर काढा सुंदर मेहंदी, नवऱ्याचं प्रेम वाढेल

Maharashtra News Live Update: गोकुळ वाचवण्यासाठी हा जनसागर रस्त्यावर आलाय - राजू शेट्टी

Sunil Grover: एका चित्रपटासाठी घेतो लाखोंचं मानधन, तरीही 'हा' अभिनेता रस्त्यावर विकतोय फुलं-कंदील; नेमकं कारण काय?

Maternity Leave: मुलाच्या जन्मानंतर महिलांच्या करिअरला ब्रेक? बाळंतपणाची रजा संपताच 25 टक्के महिला सोडतात नोकरी

राजकारणात मोठी खळबळ! अजितदादांच्या घातपातात तटकरेंचा हात आहे का? सत्ताधारी नेत्यानं केली चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT