US Rejects Indian Mangoes  Saam Tv News
देश विदेश

फळांच्या राजाला अमेरिकेनं नाकारलं, ट्रम्प तात्यांचा दुट्टपीपणा उघड; पाकचा आंबा मात्र अमेरिकेसाठी गोड

US Rejects Indian Mangoes : अमेरिकेनं पुन्हा भारताच्या पाठीत खंजीर खुपसलाय. शस्त्रसंधीचं श्रेय घेता न आल्यानं नाचक्की झालेली अमेरिका पाकवर मेहेरबाण झालीय. अमेरिकेनं नेमकी काय भूमिका घेतलीय? आणि अमेरिकेच्या निर्णयाचा भारताला कसा फटका बसणार?

Prashant Patil

नवी दिल्ली : दरवर्षी अमेरिकेन जनता फळांचा राजा भारतीय आंबा चवीने खात असते. भारत अमेरिकेला 22 ते 23 हजार मेट्रीक टन आंब्यांची दरवर्षी निर्यात करतो. मात्र भारत पाकिस्तान तणाव निर्माण झाल्यानंतर आता अमेरिकेनं भारताच्या पाठीत खंजीर खुपसलाय. अमेरिकेने भारतातील आंबा नाकारुन भारताचा दुश्मन असलेल्या पाकिस्तानच्या आंब्याची मागणी केलीय. एवढंच नाही तर भारतानं पाठवलेला आंबा नाकारुन न तो परत न्या किंवा त्यांची विल्हेवाट लावा, अशी तुसडी भुमिका घेतलीय.

अमेरिकेनं भारताच्या 15 आंब्यांच्या शिपमेंट परत पाठवण्याचा निर्णय घेतला

लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को, अटलांटा विमानतळावर निर्यातीसाठी आलेले आंबे तसेच पडून आहेत

या आंब्यांची किंमत 4 कोटी रुपये

PPQ- 203 हे अमेरिकन निर्यातीसाठी आवश्यक असलेलं प्रमाणपत्र भारतात मिळालं

मात्र कागदपत्रात गडबड झाल्याचं कारण देत अमेरिकेत मज्जाव

15 आंब्यांच्या शिपमेंट घेऊन जाण्यास किंवा नष्ट करण्याचे निर्देश

पाककडून 13 हजार मेट्रीक टन आंबा अमेरिकेला दरवर्षी निर्यात करतो. आता ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकेन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानमधील शस्त्रसंधीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतानं तो हाणून पाडला. आता अमेरिकेला दहशतवाद्यांच्या पाकचा आंबा चालतोय. खरंतर अमेरिकेतील एका कंपनीनं पाकिस्तानातील दहशतवाद्यांना सेटलाईट फोटो पुरवून भारतातील पहलगाम हल्ल्यात मदत केली. त्यात अमेरिकेच्या अध्यक्षांनी एॅपलचे भारतातील उत्पादन थांबवण्याचा अनावश्यक सल्ला देऊन आपला दुट्टपीपणा उघड केला. एकीकडे भारताला मित्र म्हणायचं आणि दुसरीकडं मित्राच्याच पाठित खुंजीर खुपसायचा, हे ट्रम्प तात्या तुम्हाला शोभत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

SCROLL FOR NEXT