America Shooting Saam Tv
देश विदेश

Shocking: विद्यापीठात रक्तरंजित थरार! परीक्षेदरम्यान अंदाधुंद गोळीबार, दोघांचा जागीच मृत्यू

Shooting at Brown University: गोळीबाराच्या घटनेने अमेरिका देश पुन्हा हादरला आहे. विद्यापीठामध्ये परीक्षा सुरू असताना अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या घटनेत दोघांचा मृत्यू तर ८ जण गंभीर जखमी झाले.

Priya More

Summary:

  • अमेरिकेत गोळीबाराची घटना घडली

  • ब्राउन विद्यापीठात अंतिम परीक्षेदरम्यान अंदाधुंद गोळीबार

  • गोळीबारात दोघांचा मृत्यू तर ८ जण गंभीर जखमी

  • गोळीबारानंतर आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत

अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली. अमेरिकेतील रोड आयलंडमधील प्रतिष्ठित ब्राउन विद्यापीठात शनिवारी दुपारी गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराच्या घटनेमुळे विद्यार्थी प्रचंड घाबरले. विद्यापीठामध्ये अंतिम परीक्षा सुरू असतानाच अचानक गोळीबार झाला या घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

काळ्या रंगाच्या कपड्यात आलेल्या एका तरुणाने इंजिनिअरिंग विभागाच्या इमारतीत अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोर फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना बारुस आणि हॉली इमारतींमध्ये घडली. याठिकाणी विद्यापीठाचा अभियांत्रिकी आणि भौतिकशास्त्र विभाग आहे. या इमारतीत परीक्षा सुरू होत्या. गोळीबाराच्या घटनेमुळे विद्यापीठाचा संपूर्ण कॅम्पस हादरून गेला. सर्व विद्यार्थी प्रचंड घाबरले.

गोळीबाराच्या घटनेनंतर विद्यापीठाने एक अलर्ट जारी केला की, विद्यार्थ्यांना त्यांच्या क्लासरूमचे दरवाजे बंद करण्याचा, त्यांचे फोन सायलेंट करण्याचा आणि लपण्याचा सल्ला दिला होता. या गोळीबारामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्याचा शोध सुरू केला आहे.

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, हल्लेखोर तरुण काळ्या रंगाच्या कपड्यात होता. गोळीबार केल्यानंतर तो इमारतीतून होप स्ट्रीटच्या दिशेने पळून गेला. गोळीबारानंतर पोलिस विद्यापीठाच्या संपूर्ण कॅम्पस आणि इमारतींची झडती घेत आहेत आणि आजूबाजूच्या परिसरात आरोपीचा शोध घेत आहेत. जखमींची प्रकृती गंभीर आहे परंतु स्थिर आहे. त्यांना सर्वांना रोड आयलंड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या बाजूच्या परिसरातील लोकांना घरातच राहण्याचा आणि घराबाहेर पडू नये असे सांगण्यात आले आहे. या गोळीबाराच्या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यातील सर्वाधिक थंडी पूर्ण शहरात, पारा ९.५ अंशावर

Yoga Time: योगा कधी करावा? सकाळी की संध्याकाळी? जाणून घ्या योगासनांची योग्य वेळ

Ladki Bahin Yojana: ४ दिवसात लाडकीच्या खात्यात खटाखट ₹ ३००० येणार, बड्या मंत्र्यांची घोषणा

Success Story: कौतुकास्पद! IPS ट्रेनिंगदरम्यान झाले IAS; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; ऋत्विक वर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींच्या आज आर्थिक समस्या सहज दूर होतील; जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT