America News Saam Tv
देश विदेश

America News: अमेरिका बनतोय सर्वात शक्तीशाली आणुबॉम्ब; हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा २४ पटीने Powerful

America News: इस्राइल- हमास युद्धाच्या दरम्यान अमेरिकेच्या संरक्षण विभागाने मोठी घोषणा केलीय.

Bharat Jadhav

Most Powerful Nuclear Bomb In America :

रशिया-युक्रेन युद्ध त्यानंतर इस्राइल आणि हमासच्या युद्धामुळे जगातील देश दोन भागात विभागली गेली आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे चीन आणि अमेरिका यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. जगभरात होणाऱ्या या घडामोडीमुळे तिसऱ्या महायुद्धाचे चित्र निर्माण झालंय. यासर्व परिस्थितीमध्ये अमेरिकेमधून एक मोठी बातमी समोर आलीय. (Latest News)

जगात निर्माण झालेल्या स्थितीची कल्पना लक्षात घेत, भविष्यात उद्भवणाऱ्या आव्हानांना तोंड कशाप्रकारे द्यायची यासाठी अमेरिका तयारीला लागलाय. जर जगात युद्धासारख्या आणीबाणीची स्थिती निर्माण झाली तर त्याचा सामना करण्यााठी अमेरिका जगातील सर्वात शक्तीशाली आणुबॉम्ब तयार करू लागलाय. हा बॉम्ब दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान जापानच्या हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या बॉम्बपेक्षा २४ पटीने शक्तीशाली असणार आहे. अमेरिकेचा हा निर्णय अनेक देशांचं टेन्शन वाढवणारा आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या घोषणेनुसार, हा B६१ आणुबॉम्ब ग्रॅव्हिटी बॉम्बची आधुनिक आवृत्ती असले. याला B६१- १३ असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान बॉम्ब बनवण्यासाठी तेथील संसदेने मंजुरी दिलीय. फॉक्स या वृत्यानुसार, पेंटागन प्रसारित करण्यात आलेल्या वृतानुसार, B६१-१३ चा निर्मिती द डिपार्टमेंट ऑफ एनर्जीज नॅशनल न्यूक्लिअर सिक्योरिटी एडमिनिस्ट्रेशनद्वारे केली जातेय.

या B६१-१३ आणुबॉम्बचे वजन ३६० किलो असून हा बॉम्ब B६१-७च्या जागा घेणार आहे. म्हणजेच काय अमेरिका आणुबॉम्बची संख्या वाढवत नाहीये, परंतु या बॉम्बची शक्ती वाढवत आहे. अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जापान या देशावर आणुबॉम्ब टाकला होता. या बॉम्बचं वजन १५ किलोटन होतं. तर नागासाकीवर टाकण्यात आलेल्या बॉम्बचं वजन २५ किलो होतं. म्हणजेच काय आता नव्याने तयार करण्यात येणारा आणुबॉम्ब हा हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या बॉम्बपेक्षा २४ पटीने शक्तीशाली असेल.

जगाच्या सध्याच्या सुरक्षा परिस्थितीत बदलणारे आणि वाढते धोके लक्षात घेऊन ही घोषणा करण्यात आलीय. आम्ही आमच्या देशाला आणि आमच्या मित्रांना खात्री देऊ इच्छितो की, आम्ही वाढत्या सुरक्षेच्या आव्हानांबद्दल जागरूक आहोत. गरज पडल्यास त्यांना योग्य प्रतिसाद देण्यास सक्षम आम्ही सक्षम असल्याचं अंतराळ संरक्षण धोरणाचे सहाय्यक सचिव जॉन प्लंब यांनी सांगितले.

B६१-१३ हे आधुनिक गतिशील सुरक्षा वातावरणाच्या आव्हानांना समोरे जाण्यास एक योग्य निर्णय आहे. या निर्णयामुळ आपल्या मनात लोभ निर्माण होईल. परंतु B६१-१३ चे उत्पादन केल्यानंतर आम्ही परमाणू शक्तीच्या शस्त्रात वाढ करणार नसल्याचंही प्लंब म्हणाले. फॉक्स या वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, या नव्या बॉम्बमध्ये सुरक्षा आणि अचूकता याची वैशिष्ट्ये आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj : 'आईविना जगण किती अवघडं असतं' धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ट्रेलर प्रदर्शित

घरबसल्या अनुभवा ॲक्शनचा धमाका; 'Kanguva' आता ओटीटीवर, कधी अन् कुठे पाहाल

Wedding Rituals Varmala Cermony: लग्नात वर-वधूला वरमाला का घालतात? नेमकं कारण काय, जाणून घ्या...

हे आहेत डोके आणि मानेचे प्रमुख कर्करोग, प्रतिबंधासाठी जीवनशैलीत करा हे बदल...

IND vs AUS: टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, विराट गेला होता हॉस्पिटलमध्ये, सरावावेळी २ फलंदाज जायबंदी

SCROLL FOR NEXT