America Court Saam Tv
देश विदेश

Shocking: कोर्टात सुरू होती सुनावणी, दुसऱ्या खोलीत महिला न्यायाधीशांनी पोलिस अधिकाऱ्यासोबत ठेवले शरीरसंबंध

America Court: अमेरिकेतील एका कोर्टात सुनावणी सुरू होती. त्याचेवळी दुसऱ्या खोलीमध्ये एक महिला न्यायाधीश पोलिस अधिकाऱ्यासोबत शरीरसंबंध ठेवत होती. या घटनेची सध्या चर्चा होत आहे.

Priya More
  • अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी समोर

  • कोर्टात सुनावणी सुरू असताना घडलं भयंकर

  • दुसऱ्या खोलीत महिला न्यायाधीशाने पोलिस अधिकाऱ्यासोबत ठेवले शरीरसंबंध

अमेरिकेतील अटलांटा शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ज्याची सध्या जगभरात चर्चा होत आहे. कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती त्यावेळी शेजारच्या खोलीमध्ये महिला न्यायाधीशांनी एका पोलिस अधिकाऱ्यासोबत शरीरसंबंध ठेवले. यावेळी दोघांना याची कल्पनाही नव्हती की शेजारच्या खोलीमध्ये सुनावणी सुरू आहे आणि त्याठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहेत. यावेळी येणाऱ्या आवाजामुळे सुनावणीसाठी उपस्थितीत असलेल्या सर्वांना अस्वस्थ वाटले.

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, फेडरल न्यायाधीश आणि एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे दीर्घकाळापासून विवाहबाह्यसंबंध होते. ते दोघेही आधीच विवाहित होते. अशातच त्यांनी कोर्टात सुनावणी सुरू असताना शेजारच्या खोलीमध्ये शरीरसंबंध ठेवले. त्यामुळे सर्वजण चकीत झाले. केली कोलिअर हे अटलांटा पोलिस दलातील एक वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांची नियुक्ती माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रशासनादरम्यान झाली होती अशी माहिती समोर आली आहे.

५५ वर्षीय कोलिअर सध्या अटलांटा पोलिस दलातील सामुदायिक सेवा विभागाच्या कमांडर म्हणून कार्यरत आहेत. न्यायाधीश आणि पोलिस अधिकाऱ्याने कोर्टात शरीरसंबंध ठेवल्याच्या घटनेनंतर पोलिस दलाने त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी न्यायिक समितीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या दाखल केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, सुनावणीच्या वेळीसुद्धा न्यायाधीश रॉस आणि कॉलिअर अनेकदा एकट्याच असायचे. ज्यामुळे बाहेर बसलेल्या लोकांना अस्वस्थ वाटायचे. या संदर्भात शुक्रवारी संध्याकाळी कॉलिअर यांना नोटीस बजावण्यात आली. पण त्यांच्या कार्यालयाने उत्तर दिले की त्या सध्या शहराबाहेर आहेत.

कोर्टाने दिलेल्या माहितीनुसार, रॉस गेल्या २ वर्षांपासून अटलांटा कोर्टात कार्यरत असून त्या नियमितपणे फौजदारी खटल्यांची सुनावणी करतात. त्यांच्यावर स्वतःवरही विवाहबाह्य संबंधांचे आरोप करण्यात आले आहेत. चौकशी समितीने सांगितले की, कॉलिअर १९९८ पासून अटलांटामध्ये कार्यरत आहेत. कॉलिअर हे विश्लेषण, संगणक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन धोरणांमधील त्यांच्या कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत. रॉस यांची २०१४ मध्ये जॉर्जियाच्या नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

KBC 18: दिवसाला ८०० रुपये कमावणाऱ्या कृष्ण कुमावत यांनी KBCमध्ये जिंकले ५० लाख; १ कोटींच्या प्रश्नावर घेतला 'हा' निर्णय

DA Hike 2026 : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! DA मध्ये थेट 3% वाढ? पगारात होणार एवढी वाढ

SCROLL FOR NEXT