Horrific Accident in USA  Saam tv
देश विदेश

Horrific Accident : थरारक! भरधाव कारने २० हून अधिक जणांना चिरडलं, ५ जणांची प्रकृती चिंताजनक

Horrific Accident in USA : लॉस एंजिल्सच्या भरधाव कारने २० हून अधिक जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातातील ५ जणांची प्रकृती गंभीर आहे.

Vishal Gangurde

अमेरिकेमधील कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजिल्स शहरात शनिवारी भीषण दुर्घटना घडली आहे. लॉस एंजिल्सच्या ईस्ट हॉलिवूडमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. या भागात एका भरधाव कारने अनेकांना चिरडलं. या दुर्घटनेत २८ हून अधिक जण जखमी झाले आहेत.

लॉस एंजिल्सच्या अग्निशमन दलाने या घटनेविषयी माहिती दिली. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, दुर्घटनेत २८ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. ८-१० जण गंभीर जखमी झाले आहेत. तर १९ जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

लॉस एंजिल्सच्या पश्चिम सैंटा मोनिका बुलेवार्डजवळ असलेल्या परिसरात शनिवारी अमेरिकेच्या वेळेनुसार, रात्री २ वाजता ही दुर्घटना घडली. या अपघतातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली.

भरधाव कारने चिरडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांचा घटनास्थळी मोठा फौजफाटा आहे. लॉस एंजिल्सच्या सरकारी अधिकाऱ्यांनी देखील दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेतील कार चालकाची कोणतीही माहिती मिळालेली नाही.

स्थानिक अधिकाऱ्यांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. कार चालकाने लोकांना का चिरडलं, याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे. या अपघाताचा अपघाताचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये काही जण रस्त्यावरील जखमींना रुग्णालयात घेऊन जात आहेत. काही जण अपघातात गंभीर जखमी झाल्याचे दिसत आहे.

काल ट्रेनिंग सेंटरजवळ भीषण स्फोट

दरम्यान, लॉस एंजिल्सच्या काऊंटी शेरिफ विभागाच्या ट्रेनिंग सेंटरजवळ मोठा स्फोट झाला. या घटनेत काही जण जखमी झाले. स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता. एका वाहनाजवळ हा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की, अनेक घरांच्या काचा देखील फुटल्या. स्फोटाचं कारण स्पष्ट झालेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: पवईत घराची भिंत कोसळली, १ जण गंभीर जखमी

Nitesh Rane : वाळू चोरणाऱ्यांचे हात तोडले पाहिजे; वाळू चोरीवरून मंत्री नितेश राणे आक्रमक

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला, कार डिव्हायडर तोडून ट्रकला धडकली, ६ मित्रांचा मृत्यू

Jalna : स्वातंत्र्यदिनी आंदोलन करणाऱ्याच्या कमरेत पोलीस अधिकाऱ्याने घातली लाथ, व्हिडीओ व्हायरल

Chanakya Niti : लग्नानंतर प्रेम कमी होऊ नये म्हणून हा गुपित मंत्र

SCROLL FOR NEXT