American Law Saam Digital
देश विदेश

American Law : अमेरिकेचा हा कोणता न्याय! भारतीय विद्यार्थीनीला कार खाली चिरडणाऱ्या पोलिसाविरोधात चालणार नाही खटला

Indian Students Studying Abroad : अमेरिकेत शिक्षण घेणारी भारतीय विद्यार्थीनी जान्हवी कंदुलाची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. मात्र या अधिकाऱ्यावर कोणताही खटला चालवला जाणार नसल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

Sandeep Gawade

American Law

अमेरिकेत शिक्षण घेणारी भारतीय विद्यार्थीनी जान्हवी कंदुलाची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. एका पोलीस अधिकाऱ्यांने तिला कारखाली चिरडत खिल्ली उडवली होती. जानवीच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा होती. मात्र या अधिकाऱ्यावर कोणताही खटला चालवला जाणार नसल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. केविन डेव्ह असं आरोपी सीएटल पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे.

जान्हवी कंदुलाचा मृत्यू हृदयद्रावक होता. अमेरिकन अधिकाऱ्यांनीही हे मान्य केले आहे. 23 जानेवारीला ही घटना घडली, त्यावेळी 23 वर्षीय जान्हवीलाला सीएटलमध्ये रस्ता ओलांडताना पोलिसांच्या कारने धडक दिली. सीएटल पोलीस अधिकारी केविन डेव्ह पोलीस व्हॅन चालवत होते. केविन डेव्हला ड्रग्जच्या ओव्हरडोसशी संबंधित फोन घेण्याच्या घाईत होता, असं म्हटलं जातं.

एका अधिकाऱ्याने उडवली किल्ली

केविन ताशी 120 किलोमीटर वेगाने कार चालवत होता. याच भरधाव कारने जान्हवीला धडक दिली. या धडकेत ती 100 फूट अंतरापर्यंत फेकली गेली. सीएटल पोलीस विभागाचे अधिकारी डॅनियल ऑर्डरर नंतर या घटनेवर हसताना दिसून आले. डॅनियलने गुन्हेगारी तपासात कोणताही सहभाग स्पष्टपणे नाकारला. इतकच नाही तर त्याने हसत हसत, तशीही ती 26 वर्षांची होती…तिला काही विशेष महत्त्व नव्हतं, असं उत्तर दिलं होतं.

कोण होती जान्हवी कंदुला?

या घटनेनंतर अमेरिकेच्या सीएटल पोलीस विभागाच्या कृतीवर प्रश्न उपस्थित होत असून न्यायाबाबत त्याच्या कबुलीजबाबावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जान्हवी कंदुला नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटी, सीएटल कॅम्पसमधून पदवीचं शिक्षण घेत होती. जान्हवीच्या निधनानंतर विद्यापीठाने त्यांच्या कुटुंबीयांना मरणोत्तर पदवी प्रदान करणार असल्याचे सांगितले होते. ज्या अधिकाऱ्याने वाहनाला धडक दिली त्या अधिकाऱ्याने जाणिवपूर्वक हे कृत्य केलं नसल्याचं तपास यंत्रणांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

SCROLL FOR NEXT