Accident  Saam
देश विदेश

Accident : अंबेडकरनगरमध्ये मध्यरात्री भीषण अपघात, अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांनाच चिरडले, ८ जणांचा मृत्यू

Ambedkar Nagar latest news : उत्तर प्रदेशातील अंबेडकरनगरमध्ये मदत करणाऱ्यांनाच भरधाव कारने चिरडल्याची भीषण घटना घडली. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

Ambedkarnagar Accident News : रात्रीच्या अंधारात अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या लोकांना एका भरधाव कारने चिरडल्याची हृदयद्रावक आणि संतापजनक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे.

अंबेडकरनगरमधील जलालपूरमध्ये रविवारी रात्री १२ वाजताच्या आसपास एक अपघात झाला होता. या अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी काही स्थानिक नागरिक जमले होते. पण त्याच वेळी भरधाव वेगाने येणाऱ्या एका अनियंत्रित कारने मदत करणाऱ्या लोकांनाच चिरडले. या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मदत करणाऱ्यांनाच चिरडले, मध्यरात्री थरार -

स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री १२ वाजताच्या आसपास जलालपूरमध्ये २ दुचाकीची जोरात धडक झाली. अपघातानंतर दुचाकीवरील लोक गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले होते. अपघाताचा आवाज ऐकताच गावकरी मदतीसाठी तात्काळ पोहचले. त्या अपघातग्रस्तांची गावकरी मदत करत होते. जखमींना रूग्णालयात नेहण्यासाठी काहीजण जमले होते. पण त्याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका भरधाव कारने लोकांनाच चिरडले.

८ जणांचा मृत्यू

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना तात्काळ जवळच्या सरकारी रूग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला होता. २ जणांना उपचारावेळी प्राण सोडले. काही जणांवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा व्यक्त करण्यात येत आहे.

कैफी (३२), उत्तम कुमार (२४), आदित्य कुमार (२५), लालचंद (२४), राजू गुप्ता (३२) आणि छोटू यांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातातील सर्व मृत आंबेडकर नगरचे रहिवासी होते. दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या उत्तर प्रदेश पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल केला असून तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दररोज सलग महिनाभर कोरा चहा प्यायल्याने शरीरात काय काय घडते? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Maharashtra News Live Update: यवतमाळात वंचितच्या 14 आंदोलकांवर गुन्हे दाखल

Monsoon Saree Collection : स्टायलिश अन् कम्फर्टेबल! पावसाळ्यातही नेसा सुंदर साड्या, 'हे' लेटेस्ट कलेक्शन एकदा नक्की पाहा

Veen Doghantali Hi Tutena : घट्ट मिठी, गालावर किस; समर-स्वानंदीच्या नात्यात रोमँटिक केमिस्ट्री सुरू, पाहा VIDEO

Earthquake : नाशिक पुन्हा भूकंपाने हादरले, मध्यरात्री २ तालुक्यात जमीन थरथरली अन्...; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT