Baltal base camp lights up as thousands of devotees gather for the sacred Amarnath Yatra; 3,000 tents, tight security, and RFID chaos mark the first day. 
देश विदेश

Amarnath Yatra : बम बम भोले! अमरनाथ यात्रेला आजपासून सुरूवात, भाविकांमध्ये प्रचंड उत्साह

Devotee experience at Amarnath Baltal base camp: अमरनाथ यात्रा सुरू झाली असून बालटाल कॅम्पवर ३००० टेन्ट उभारण्यात आले. भाविकांची गर्दी, आरएफआयडी गोंधळ आणि गुलाबी थंडीत विद्युत रोषणाईने वातावरण भक्तिमय झाले आहे.

Akshay Badve

Amarnath Yatra Latest News Update : हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र तीर्थयात्रा असलेली अमरनाथ यात्रा आजपासून सुरू झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील ३८८० मीटर उंचीवर असलेल्या अमरनाथ गुहेत भगवान शंकराच्या बर्फी शिवलिंगाचे (बाबा बर्फानी) दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक सहभागी होतात. ही यात्रा ९ ऑगस्टपर्यंत ३८ दिवस चालेल. पहलगाम आणि बालटाल या दोन मार्गांद्वारे यात्रा होते, ज्यामध्ये कठीण डोंगर-दऱ्या पार कराव्या लागतात. सुरक्षेसाठी CRPF, जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कर तैनात आहे. यात्रेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन नोंदणी १५ एप्रिलपासून सुरू झाली होती, आणि वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक आहे.

अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र या यात्रेच्या दरम्यान लागणाऱ्या आरएफआयडी प्रक्रियेत सावळा गोंधळ पहायला मिळतोय. बुधवारी रात्री 9 वाजल्यापासून बालताल बेस कॅम्पवर भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. बोर्डाकडून निर्धारित तारखेच्या व्यतिरिक्त इतर तारखेच्या भाविकांना पास दिले जातायत. त्यामुळे भारतातील विविध भागातून येणाऱ्या भाविकांचे अतोनात हाल होतायत.

३००० टेन्ट, भाविकांची अलोट गर्दी! अमरनाथचे दर्शन घेण्यासाठी शिवभक्त आतुर

बाबा बर्फानी म्हणजेच बाबा अमरनाथ यांचे दर्शन घेण्यासाठी कश्मीरच्या बालताल बेस कॅम्पमध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळतेय. बालतालमध्ये आलेल्या भाविकांसाठी या ठिकाणी टेन्ट मध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव संध्याकाळी ६ नंतर बालताल बेस कॅम्प मध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही. या बेसवर ३००० पेक्षा अधिक टेन्ट उभारले गेले आहेत. या टेन्टमध्ये राहून पहाटे अमरनाथ यात्रेला सुरुवात होते. अमरनाथच्या गुहे पर्यंत जायचं अंतर १५ किलोमिटर पेक्षा अधिक असल्याने भाविक पायी किंवा खेचर, डोली करून जाऊ शकतात. यात्रेच्या पहिल्याच दिवशी याठिकाणी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित आहेत.

विद्युत रोषणाईने सजला बालताल कॅम्प

बाबा अमरनाथचे दर्शन घेण्यासाठी बालताल बेस कॅम्प मध्ये भाविकांची मोठी गर्दी आहे. भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून या कॅम्प मध्ये सगळीकडे विद्युत रोषणाई केली आहे. अगदी पार्किंग पासून ते टेन्ट पर्यंत सगळे रस्त्यांना दिवे लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी तर प्रशासनाने विद्युत रोषणाई ची सजावट केली आहे. एरवी निर्मनुष्य असलेला हा बेस कॅम्प मध्ये मात्र आज गुलाबी थंडी आणि या रोषणाई ने बहरुन गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Decoration Ideas : गणपतीसाठी डेकोरेशन व पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू, जाणून घ्या पूर्ण यादी

Maharashtra Politics : ...म्हणूनच रोहित पवार आमदार झाला, अजित पवारांचा टोला

Wardha News : मनाला चटका लावणारी घटना; शेतावर फवारणीसाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

Crime News: घरात चोर शिरल्याचा संशय, नवऱ्यानं उघडला बायकोच्या रुमचा दरवाजा, दृश्य पाहून धक्काच बसला

Maharashtra Live News Update: पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - मंत्री दत्तात्रय भरणे

SCROLL FOR NEXT