Amarinder Singh: पंजाब राजकरणातील कॅप्टन पर्वाचा अंत Saam Tv
देश विदेश

Amarinder Singh: पंजाब राजकरणातील कॅप्टन पर्वाचा अंत

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना हटवण्याची तयारी सुरू होती.

वृत्तसंस्था

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या सुरू असलेल्या भांडणात आज संध्याकाळी 5 वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. दरम्यान, सूत्रांच्या हवाल्याने बातम्या येत आहेत की कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधींना स्पष्ट केले आहे की अशा अपमानासह काँग्रेसमध्ये राहणे शक्य नाही. पंजाब काँग्रेसच्या (Panjab Congress) भांडणात, काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांना हटवण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसच्या कार्यवाहक राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानंतर अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना हटवण्याची तयारी सुरू होती.

हे देखील पहा-

कॅप्टन अमरिंदर सिंग- कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंजाबचे सध्याचे (26 वे) मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी त्यांनी 2002-2007 पर्यंत पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून काम केले होते. ते पटियाळा येथून विधानसभेचे निवडून आलेले सदस्य आहेत, तसेच पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. 1980 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची जागा जिंकली होती . राजकारणा व्यतिरिक्त सिंग यांनी 1963 ते 1966 पर्यंत भारतीय लष्करासाठी सेवा केली.

कॅप्टन अमरिंदर सिंग जन्म, शिक्षण;

सिद्धू ब्रारच्या फुलकिया घराण्यातील अमरिंदर सिंह यांचा जन्म महाराजा यादवेंद्र सिंग आणि पटियाळाच्या महाराणी मोहिंदर कौर यांच्या परिवारात झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण वेल्हम बॉईज स्कूल आणि लॉरेन्स स्कूल सांवर, दून स्कूल, डेहराडून येथे केले.

अमरिंदर सिंग यांचा परिवार;

त्यांची पत्नी प्रनीत कौर 2009 ते 2014 पर्यंत परराष्ट्र मंत्रालयात खासदार आणि राज्यमंत्री होत्या. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

राजकारणात येण्यापूर्वीचे योगदान;

राजकारणात येण्यापूर्वी, ते भारतीय सैन्यात होते. नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन मिलिटरी अकॅडमीमधून पदवी घेतल्यानंतर, ते 1963 मध्ये भारतीय सैन्यात सामील झाले आणि 1965 मध्ये त्यांनी राजीनामा दिला. पाकिस्तानशी युद्धानंतर ते पुन्हा भारतीय सैन्यात सामील झाले आणि 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धाचा कर्णधार म्हणून त्यांनी काम केले.

कॅप्टन अमरिंदर सिंग हे एक लेखक आहेत. त्यांनी युद्ध आणि शीख इतिहासावर अनेक पुस्तके लिहिली आहेत, ज्यात 'ए रिज टू फार', 'लेस्ट वी फॉरगेट', 'द लास्ट सनसेट: राइज अँड फॉल ऑफ लाहोर दरबार' आणि 'द शीख इन ब्रिटन: 150 इयर्स ऑफ फोटोग्राफ्स'; हे आहेत.

त्यांचे सर्वात अलीकडेचं भारताचे लष्करी योगदान 1914 ते 1918 च्या महायुद्धात, 6 डिसेंबर 2014 रोजी चंदीगडमध्ये प्रसिद्ध झाले होते. तसेच दि मॉनसून वॉर: यंग ऑफीसर्स रीमिनाइस 1965 इंडिया-पाकिस्‍तान वॉर, ज्यामध्ये 1965 च्या भारत-पाक युद्धाशी संबंधित त्यांच्या आठवणी आहेत. पोलो, रायडिंग, क्रिकेट, स्क्वॉश आणि बॅडमिंटन या खेळात त्यांना विशेष रुची आहे.

राजनीतिक प्रवास;

1980- कॅप्टन अमरिंदर सिंग यांना राजीव गांधींनी काँग्रेसमध्ये सामील केले. ते प्रथमच लोकसभेवर निवडले गेले. राजीव आणि अमरिंदर शाळेचे मित्र होते.

1984- मध्ये त्यांनी ऑपरेशन ब्लू स्टार दरम्यान सैन्याच्या कारवाईचा निषेध म्हणून त्यांनी संसद आणि काँग्रेस पक्ष सोडला. त्यानंतर ते शिरोमणी अकाली दलात सामील झाले.

1985- मध्ये त्यांनी अमरिंदरसिंग तलवंडी पंजाब विधानसभेसाठी साबो मतदारसंघातून निवडून आले. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या अवतार सिंह यांचा पराभव केला. नंतर ते राज्य सरकारमध्ये कृषी, वनीकरण, विकास आणि पंचायत मंत्री झाले.

1992- शिरोमणी अकाली दल (पंथिक) नावाचा एक वेगळा गट तयार करण्यासाठी त्यांनी अकाली दलाचा राजीनामा दिला, जो गट नंतर काँग्रेसमध्ये विलीन झाला होता.

1998- मध्ये अमरिंदर सिंग यांनी पंजाब विधानसभेची निवडणूक पटियाला संसदीय मतदारसंघातून लढवली पण प्रेमसिंग चंदूमाजरा यांच्याविरुद्ध ते पराभूत झाले होते. नंतर त्यांनी शिरोमणी अकाली दल (पंथिक) काँग्रेसमध्ये विलीन केला आणि आपल्या जुन्या मित्रांमध्ये सामील झाले.

1998- मध्ये त्यांची पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ते 2002 पर्यंत या पदावर राहिले होते.

2002- 26 फेब्रुवारी 2002 रोजी ते पंजाबचे मुख्यमंत्री झाले. 1 मार्च 2007 पर्यंत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून आपला पहिला कार्यकाळ पूर्ण केला.

2008- मध्ये पंजाब काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

2010 ते 2013- या दरम्यान पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पदावर होते.

2014- ते पंजाब विधानसभेवर पाच वेळा सदस्य म्हणून निवडले गेले, ज्यामध्ये त्यांनी तीन वेळा पटियालाचे प्रतिनिधित्व केले आणि एक वेळा सामना आणि तलवंडी साबू चे प्रतिनिधित्व केले. ते 1 सप्टेंबर 2014 ते 23 नोव्हेंबर 2016 पर्यंत संरक्षण मंत्रालयाच्या स्थायी समिती आणि संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य होते.

2015- मध्ये त्यांची पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.

2016- मध्ये त्यांनी 23 नोव्हेंबर 2016 रोजी लोकसभेचा राजीनामा दिला. ते पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये पूर्णपणे व्यस्त होते.

2017- निवडणुकीत काँग्रेसने बहुमताने विधानसभा जिंकली आणि कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्री झाले. त्यांनी पंजाबचे 26 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

2021- अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

World : जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? हनिमूनसाठी सर्वात रोमँटिक ठिकाण

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

SCROLL FOR NEXT