पंजाबचे 'कॅप्टन' बदलणार; मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा
पंजाबचे 'कॅप्टन' बदलणार; मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामाSaam TV

पंजाबचे 'कॅप्टन' बदलणार; मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा

काँग्रेसच्या कार्यवाहक राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना राजीनामा देण्यास सांगितले होते.
Published on

पंजाबच्या राजकारणात (Panjab Politics) आज मोठा स्फोट झाला आहे. पंजाब काँग्रेसच्या (Panjab Congress) भांडणात, काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांना हटवण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसच्या कार्यवाहक राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानंतर अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना हटवण्याची तयारी सुरू होती.

आता पंजाबचे नवे मुख्यमंत्री कोण याबाबत लवकरच निर्णय घेण्याक येणार आहे. पंजाब काँग्रेस भवनात पक्षाची बैठक पार पडली. दुसरीकडे, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या समर्थकांची बैठक रद्द केली होती. पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड आणि पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांची नावे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होती.

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधींना फोन करून राजीनाम देण्याची इच्छा व्यक्त केली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्याशीही त्यांनी बोलणी केल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, अशीही चर्चा आहे की, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदावरून काढून टाकल्यास काँग्रेस सोडण्याची धमकीही दिली आहे. बातम्या येत आहेत की त्यांनी हायकमांडला सांगितले आहे की जर पक्षाचा हा त्रास संपला नाही तर ते पक्षही सोडतील.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com