BJP MP Soumitra Khan addressing the media after making serious allegations regarding PM Modi’s security during Lok Sabha proceedings. Saam Tv
देश विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर लोकसभेत हल्ला होणार होता; बड्या नेत्याचा स्फोटक दावा

Pm Modi Attack Plot Allegation LokSabha: लोकसभेतील गोंधळादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शारीरिक हल्ल्याचा कट रचला जात होता, असा गंभीर आरोप भाजप खासदार सौमित्र खान यांनी केला असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

लोकसभेच्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा सुरू आहे. अधिवेशनच्या पहिल्या दिवसापासूनच राहुल गांधी ही आक्रमक झाले होते. माजी लष्कर प्रमुख यांच्या अप्रकाशित पुस्तकामधील काही मुद्दे राहुल गांधी यांनी सांगितले. चीनने कशाप्रकारे घुसखोरी केली आणि सरकारने या मुद्याकडे लक्ष दिले नसल्याचे राहुल गांधी यांनी आरोप केला. यावरून मोठा गदारोळ झाला.

यानंतर बुधवारी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार होते. पण विरोधकांची घोषणा आणि गोंधळ कायम राहिल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. त्यामुळे मोदी उत्तराचे भाषण देऊ शकले नाही. काल झालेल्या या गोंधळाबद्दल आता भाजपचे खासदार सौमित्र खान यांनी कॉँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शारीरिक हल्ला करणार होती असा गंभीर दावा केला आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, त्यामध्ये मोदींवर हल्ला करण्याचा कट आखला जात होता. महिला खासदारांना पंतप्रधानांच्या समोर जाण्यासाठी पुढे करण्यात आले. असे ही सूत्रांनी सांगितले आहे.

भाजप खासदार काय म्हणाले?

एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाजप खासदार सौमित्र खान म्हणाले, ज्या प्रकारे विरोधक वागत आहेत. त्यावर असे वाटत आहे की, हे लोक मोदींना मारण्यासाठी षडयंत्र करत आहेत. काल जे घडले आहे. जे घडत होते. त्यावरून असे वाटत होते की, हे लोक मोदींना मारण्यासाठी जात आहेत. विरोधकांचे राजकारणात काहीही अस्तित्व राहिलेले नाही, त्यामुळे ते मोदींना मारण्याचा प्रयत्न करत आहेत. ते डाव्या बाजूला बसतात, पण उजव्या बाजूला का येत होते, कारण ते मोदींवर हल्ला करणार होते. विरोधक जे करत आहेत, ते योग्य नाहीये असे खान म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

SCROLL FOR NEXT