BJP MP Satish Gautam Saam Tv (X Twitter)
देश विदेश

BJP MP Video: खासदारानं भरसभेत दाबला महिला आमदाराचा हात; भाजप नेत्याचं गैरवर्तन व्हिडिओमध्ये कैद

BJP MP Satish Gautam: अलीगडचे खासदार सतीश गौतम यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सतीश गौतम यांनी महिला आमदारासोबत गैरवर्तन केल्याचं दिसत आहे.

Bharat Jadhav

BJP MP Satish Gautam Video:

उत्तर प्रदेशच्या अलीगडमधील एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भाजप खासदार सतीश गौतम आणि आमदार मुक्ता राजा दिसत आहेत. या दोघांमध्ये काही तरी वाद झाल्याचं दिसत आहे. कोल मतदारसंघातील एका कार्यक्रमात हे दोन्ही नेते सहभागी झाले होते, त्याच दरम्यान या दोघांमध्ये वाद झाला होता. भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात खासदार आणि आमदार यांच्यातील ही बाचाबाची कोणीतरी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलीय. त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. (Latest News)

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये खासदार महिला आमदाराच्या खांद्यावर हात ठेवताना दिसत आहे. महिला आमदार त्याचा विरोध करते तेव्हा खासदार महिला आमदाराच्या दोन्ही खांदे दाबत हसत असल्याचं दिसत आहे. दरम्यान या सार्वजनिक कार्यक्रमाचे दृश्य पाहून सोशल मीडियावर खासदारांवर टीका केली जातेय. दरम्यान हा व्हिडिओ खरा आहे की बनवण्यात आलाय याची शाश्वती साम डिजिटलला झालेली नाहीये.

खासदाराच्या या कृत्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खासदारांच्या या कृतीवर टीका केली जात आहे. कोल भागात होत असलेल्या कार्यक्रमात दोन्ही नेते हे मंचावर बसले होते. याचदरम्यान खासदारानं महिला आमदाराच्या हातावर हात ठेवला. त्याला महिला आमदारानं विरोध केला. तेव्हा खुर्चीवर बसलेल्या खासदारानं त्यांच्या दोन्ही खांदे दाबले आणि हसू लागले. यानंतर नाराज झालेल्या महिला आमदारानं आपली जागा बदलली. दरम्यान व्हायरल झालेला हा व्हिडिओ दोन दिवसाआधीचा असल्याचं सांगण्यात येत आहे.

कोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाराशर यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. श्री राम बँक्वेट हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात योगी सरकारचे परिवहन मंत्री दयाशंकर सिंह आणि उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय यांनीही हजेरी लावली होती. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माजी महापौर शकुंतला भारती, पक्षनेत्या पूनम बजाज उपस्थित होत्या.

दरम्यान अलिगड सदरचे आमदार मुक्ता राजा या माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते संजीव राजा यांच्या पत्नी आहेत. यावर्षी ११ फेब्रुवारी रोजी संजीव राजा यांचे निधन झाले. ते आजारी होते. दरम्यान वाहतूक पोलिसांसोबत मारहाणीच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर संजीव राजा यांना निवडणुकीच्या मैदानातून बाहेर पडावे लागलं होतं. त्यामुळे त्यांनी पत्नी मुक्ता राजा यांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं. त्यात त्यांचा विजय झाला आणि त्या आमदार झाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky zodiac signs: शनिवारी कार्तिक चतुर्थी! व्यवहार, चर्चा आणि निर्णयांसाठी अनुकूल दिवस; 4 राशींवर विशेष कृपा

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

SCROLL FOR NEXT