अकोला - राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीच कॉंग्रेसचे (Congress)अध्यक्ष व्हावे हेच कार्यकर्त्यांच्या मनातले आम्ही बोलत आहे असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. नाना पटोले हे आज अकोल्यातील विश्राम गृह येथे आले असताना माध्यमांशी बोलत होते. यावेळी नाना पटोले यांनी राज्य सरकारसह भाजप वर ही टीका केली आहे.
नाना पटोले म्हणाले, भाजपचे अनेक लोक काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा खुलासा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. तर राज्यातील सरकार स्वतःच कायदा सुव्यवस्था बिघडवत असून सध्याचे नवे हिंदूहृदय सम्राट हे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला विरोध करताना दिसत आहेत. दरवर्षी शिवाजी पार्कवर दसऱ्याच्या दिवशी मेळावा होतो.
काँग्रेसच्या राजवट काळातही त्यांचा मेळावा भरायचा आणि काँग्रेसवर टीकास्त्र करायचे. त्यांनी ती परंपरा कायम ठेवलेली होती. त्या परंपरेला काँग्रेस त्यावेळी सहकार्य करायची. पण आता जे नवीन हिंदूहृदय सम्राट झालेले आहेत, ते आता हिंदुच्या परंपरेला विरोध करतांना दिसत आहे असा थेट टोलानाना पटोले यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. दरम्यान, आगामी पदवीधर निवडणूका महाविकास आघाडी सोबत लढणार असल्याचे देखील नाना पटोले स्पष्ट बोलले.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी दावेदार कोण ?
सध्या अध्यक्षपदाच्या उमेदवारांबद्दल बोलायचे झाले तर केवळ दोनच नावे चर्चेत आहे. यामध्ये पहिलं नाव आहे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचे तर दुसरे नाव शशी थरुर (Shashi Tharoor) यांचे आहे. यामध्ये अशोक गेहलोत यांचं पारड जड असल्याचे बोलले जात आहे. गेहलोत यांनी याबाबत प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, पक्षश्रेष्ठींनी आपल्याला जी जबाबदारी दिली आहे, ती आपण पार पाडू. त्याचवेळी,शशी थरुरू यांचे नाव दुसरे उमेदवार म्हणून चर्चेत आहे. दरम्यान मनीष तिवारीही अध्यक्षपदासाठी फॉर्म भरू शकतात, अशी चर्चा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.