देश विदेश

अखिलेश यादव यांच्या धाकट्या भावाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टम रिपोर्टमधून कारण समोर

pratik yadav death reason : अखिलेश यादव यांचे धाकटे भाऊ प्रतीक यादव यांच्या मृत्यूचे कारण समोर आलं आहे. त्यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या पत्नीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Vishal Gangurde

अखिलेश यादव यांचा धाकटा भाऊ प्रतीक यादव यांचा मृत्यू

प्रतीक यादव यांच्या मृत्यूचे कारण पोस्टमार्टममधून समोर आले

त्यांच्या बिझनेस पार्टनरने मोठा खुलासा केलाय

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचा धाकटा भाऊ प्रतीक यादव यांचा मृत्यू झाला. प्रतीक यादव यांनी वयाच्या ३८ वर्षीय अखेरचा श्वास घेतला. अवघ्या वयाच्या ३८ व्या वर्षी प्रतीक यांचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमधून आता प्रतीक यादव यांच्या मृत्यूचे कारण समोर आलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक यादव यांचा मृत्यू नैसर्गिक आहे, असे पोस्टमार्टम अहवालातून समोर आलं आहे. डॉक्टरांनी त्यांचं हृदय आणि व्हिसेरा सुरक्षित ठेवला आहे. दोन्ही अवयव तपासासाठी पाठवण्यात येणार आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, प्रतीक यांना रुग्णालयात दाखल केलं. हातातील नाड्या पूर्णपणे मंदावल्या होत्या. हृदय थांबलं होतं. नख आणि शरीराचे काही भाग निळे पडले होते.

शासकीय रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेश चंद्र पांडे यांच्या म्हणण्यानुसार, प्रतीक यादव यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत. त्यांचं वजन खूप वाढलं होतं. त्यांचं पोस्टमार्टम जॉर्ज मेडिकल विद्यापीठाच्या ४ डॉक्टरांच्या टीमने फॉरेन्सिक एक्सपर्ट्सच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पोर्टमार्टम करताना व्हिडिओग्राफी देखील करण्यात आली.

प्रतीक यादव यांच्या बिझनेस पार्टनर सर्वेश पांडे यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की, 'मध्यरात्री प्रतीक यांची तब्येत बिघडली होती. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही वेळात माघारी आले. काही वेळानंतर अचानक सकाळी मृत अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ते किचनमध्ये बेशुद्ध होऊन कोसळले होते'.

प्रतीक यादव गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. ते फुफ्फुसाच्या आजारानेही ग्रस्त होते. त्यांच्या आजारावरही उपचार सुरू होते. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच अपर्णा यादव तातडीने आसामहून लखनौला पोहोचल्या. प्रतीक यादव यांच्या मृत्यूवर अद्याप कोणतीही अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT