Ajmer Viral Video
Ajmer Viral Video Saamtv
देश विदेश

Viral Video: क्षणात होत्याच नव्हतं झालं! तब्बल ५० फूटांवरुन कोसळला पाळणा; २५ जण जखमी, पाहा थरारक VIDEO

Gangappa Pujari

Rajasthan Viral Video: राजस्थानमधील (Rajsthan) अजमेर येथे सुरू असलेल्या स्थानिक यात्रेमध्ये मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जत्रेतील सुमारे 50 फूट उंचीवरुन एक पाळणा अचानक खाली कोसळला. त्यावेळी पाळण्यात लोक उपस्थित होते. या अपघातात 25 हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या भयंकर अपघातात अनेक महिला व मुलांची प्रकृती चिंताजनक आहे.

जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात ही धक्कादायक घटना स्पष्टपणे दिसत आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहेत. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, अजमेर येथील बसस्थानकाजवळ जत्रेचे आयोजन केले जाते. सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन परिसरात झालेल्या याच जत्रेत उभ्या फिरणारा जॉयराइड पाळणा लावण्यात आला होता. लोकांमध्ये या पाळण्याची खूप क्रेझ होती. त्यामुळे त्याभोवती मोठी गर्दी झाली होती. मंगळवारी सायंकाळी यात्रेकरू या पाळण्यावर खेळण्याचा आनंद लुटत होती. याचवेळी अचानक पाळण्याची केबल तुटल्याने पाळणा खाली कोसळला. त्यामुळे घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली. लोक घाबरून इकडे-तिकडे धावू लागले.

अपघाताची माहिती मिळताच अजमेरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील सिहाग यांच्यासह अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार, झुला पडताच त्याचा ऑपरेटर तेथून फरार झाला. घटनास्थळी तत्काळ अनेक रुग्णवाहिका बोलविण्यात आल्या आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. एएसपी सिहाग यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यात येत असून निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई करता येईल.

दरम्यान, या घटनेचा थरारक व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाळणा खाली कोसळतानाची दृश्ये या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली असून, दोषी ऑपरेटरवर कारवाई करण्याची मागणी होताना दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुतीत दादाविरुद्ध दादा संघर्ष कायम; चंद्रकांत पाटलांकडून पवारांना संपवण्याची भाषा

Maharashtra Politics 2024 : कोल्हापूरच्या विजयासाठी लाखांच्या पैजा; वाढलेल्या टक्क्यानं वाढवली उत्सुकता

PBKS vs RCB: 'विराट' वादळानं RCB चा विजयी चौकार; पंजाब प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; या संघांचं टेन्शन वाढलं

Tourist Plan: वा भारीच! फक्त 10,000 रुपयांमध्ये जा हनिमूनला

Maharashtra Politics 2024 : राज ठाकरेंनी मारलं शिवाजी पार्कचं मैदान; उद्धव ठाकरेंच्या सभेला परवानगी नाहीच

SCROLL FOR NEXT