महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद; अजित पवारांचे पंतप्रधानांना साकडे  Saam tv news
देश विदेश

महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद; अजित पवारांचे पंतप्रधानांना साकडे

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन साठहून अधिक वर्षे झाली तरीही, बेळगाव, कारवारसह महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील शेकडो मराठी भाषक गावं अजूनही महाराष्ट्राबाहेर आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र (Sanyukta Maharashtra) राज्य स्थापन होऊन साठहून अधिक वर्षे झाली. तरीही अद्याप काही गावे महाराष्ट्राबाहेर आहेत. या गावंचा प्रश्न कायम स्वरूपी सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात त्यांनी राज्याच्या सीमाभागाचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. (Ajit Pawar wrote a letter to the Prime Minister on the Maharashtra-Karnataka border issue)

हे देखील पहा-

वाचा, काय म्हटले आहे या पत्रात

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन साठहून अधिक वर्षे झाली तरीही , बेळगाव , कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागातील शेकडो मराठी भाषक गावं अजूनही महाराष्ट्राबाहेर आहेत. महाराष्ट्रातील व सीमाभागातील मराठी माणसाच्या मनात याची खंत आहे. सीमाभागातील मराठीभाषकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्याने अन्याय होत होत आहे. मराठी भाषकांसंदर्भातील कर्नाटक सरकारची कृती अन्यायपूर्ण व मानवताविरोधी आहे. सीमाभागातील मराठी बांधवांवर कर्नाटक सरकारकडून होणारा अन्याय तात्काळ थांबवून सीमाभागातील मराठीभाषक गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा , अशी सीमाभागातील मराठी बांधवांची तसेच माझी आपणास नम्र विनंती आहे.

बेळगाव, कारवार, बिदर, भालकी , निपाणीसह सीमाभागातील मराठी बांधवांचे संयुक्त महाराष्ट्र राज्य असावे , हे प्रत्येक महाराष्ट्रवासियाचे स्वप्न आहे. ते पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही. विधायक मार्गाने न्यायासाठीचा लढा सुरु राहणार आहे. संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन व्हावे, हा महाराष्ट्र सरकार व जनतेचा दृढनिर्धार आहे . महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात महाराष्ट्राच्या भूमिकेला पाठींबा देऊन सीमाभागातील मराठी बांधवांना आपण न्याय द्यावा , अशी महाराष्ट्राची इच्छा आहे.

सीमाप्रश्नाची लढाई ही महाराष्ट्राच्या वतीनं जनतेच्या मनात आणि सर्वोच्च न्यायालयात लढली जात आहे. सीमाभागातील मराठीभाषकांची आणि महाराष्ट्राची बाजू न्यायोचित असल्याने दोन्ही ठिकाणी महाराष्ट्राचाच विजय होईल, याची खात्री आहे. सदर प्रश्न आपल्या माधयमातून तातडीने मार्गी लागावा व सीमाभागातील मराठी बांधवांना लवकर न्याय मिळावा, यासाठी सीमाभागातील मराठी नागरिक आज लाखो पत्रं लिहून आपणाकडे विनंती करीत आहेत. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री या नात्याने मी देखील सीमाभागातील मराठी बांधवांच्या मागणीला पाठिंबा देत आहे, आपण मराठीभाषक बांधवांची मागणी मान्य करावी, अशी विनंती आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपण पुढाकार घेऊन मदत करावी. आपल्या माध्यमातून बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न लवकरच साकार झाल्यास मराठी माणसाला निश्चितच आनंद होईल . कृपया, सीमाभागातील मराठी बांधवांना न्याय देण्यात आपण मागे राहणार नाही, हा विश्वास आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! हाच तो क्षण, ज्याची लाखो कार्यकर्ते वाट पाहत होती, पाहा व्हिडिओ

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

Marathi bhasha Vijay Live Updates : कोणाची माय व्यायली त्यांनी मुंबईला हात लावून दाखवावा - राज ठाकरेंचा इशारा

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT