नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या अफगाणिस्तान सरकार (Afganistan Government) विरुद्ध तालिबान (Taliban) या युद्धाला अखेर पुर्णविराम (End of War) लागला आहे. काल रविवारी अफगाणिस्तानची राजधानी काबुल (Kabul) तालिबानने ताब्यात घेतल्यानंतर तिथून विदेशी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात पलायन सुरु आहे. अमेरिकेने आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पाच हजार सैनिक (U.S. Army) काबुलच्या हमीद करजाई विमानतळावर तैनात (hamid karzai airport) केले आहे. अशातच मोदी सरकारने देखील अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी पावलं उचलली आहे. (Air India planes ready to rescue Indians in Afghanistan)
हे देखील पहा -
अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना रेस्क्यु करण्यासाठी मोदी सरकारने (Modi Government) एअर इंडियाची (Air India Planes) दोन विमानं तयार ठेवली आहे. एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, ''अफगाणिस्तानातील भारतीयांची सुटका करण्यासाठी आम्ही दोन विमानं सज्ज ठेवली आहे. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सरकारने आदेश देताच आम्ही अफगाणिस्तानसाठी उडाण भरु.'' एअर इंडीयाची दोन विमानं स्टँडबायवर असून योग्य संधी मिळताच ते अफगाणिस्तानकडे झेपावणार आहेत.
एकीकडे भारत ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत होता तर दुसरीकडे याच दिवशी अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेला. अफगाणिस्तानमध्या तालिबानच्या विजय हा भारतासाठी धोका असल्याचं मानलं जातंय. कारण आयसिस, अल - कायदा यांसारख्या दहशतवादी संघटनांना आता यामुळे तालिबानचा आश्रय मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय शांततेसाठी नोबल पुरस्कार मिळवणाऱ्या मलाला युसुफजाई यांनीही अफगानिस्तानमधील महिला, पत्रकार, मानव हक्क कार्यकर्ते यांच्याबद्दल चिंता व्यक्त करत महासत्तांनी यावर तोडगा काढावा अशी विनंती केली आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.