ravis mother and 2 year old daughter x
देश विदेश

Air India चं विमान मेसमध्ये घुसलं, आई आणि दोन वर्षांच्या लेकीला शोधण्यासाठी रवीची जीवघेणी धडपड

Ahmedabad Air Plane : एअर इंडियाचे विमान ज्या हॉस्टेलमध्ये घुसले, त्या हॉस्टेलच्या मेसमध्ये रवीची आई जेवण बनवत होती. त्याच्या आईसोबत दोन वर्षांची लेक आध्या देखील होती. विमान मेसमध्ये कोसळल्यानंतर त्या दोघी अजूनही बेपत्ता आहेत.

Yash Shirke

Air India चे बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर विमान १२ जून रोजी दुपारी १.३८ वाजता सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केले. हे विमान लंडनच्या गॅटविक विमानतळाच्या दिशेने निघाले होते. उड्डाणानंतर फक्त ३२ सेकंदांमध्ये विमान खाली कोसळले. विमानामध्ये २४२ जण होते. यातील विश्वास कुमार रमेश हा एकमेव प्रवासी अपघातात बचावला.

एअर इंडियाचे विमान मेघानीनगरच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले. या हॉस्टेलमध्ये असलेले डॉक्टर्स जखमी झाले, अपघातात काहीजणांचा मृत्यू झाला. बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल कॅन्टीनमध्ये शरलाबेन ठाकोर जेवण बनवत होत्या. अपघाताच्या वेळी ठाकोर आणि त्यांची दोन वर्षांची नात हॉस्टेलमध्ये होती. शरलाबेन ठाकोर यांचा मुलगा रवी कॅम्पसमधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांना जेवण पोहोचवत होता. पण काही सेकंदातच सर्वजण गायब झाले. रवी त्याच्या आई आणि दोन वर्षांच्या लहान मुलीचा शोध घेत आहे.

'१२ जून हा आमच्यासाठी सामान्य दिवस होता. नेहमीप्रमाणे, मी दुपारी १ वाजता हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना आणि हॉस्टेलमध्ये जेवण पोहोचवण्यासाठी निघालो. मी जेव्हा परत आलो, तेव्हा विमान मेसमध्ये कोसळल्याचे मला समजले. माझी आई जिथे बसली होती, ती जागा जळाली होती', अशी माहिती रवीने माध्यमांना दिली. शरलाबेन ठाकोर आणि त्यांची दोन वर्षांची नात आध्या अजूनही बेपत्ता आहेत.

'आम्हाला ७२ तास वाट पाहण्यास सांगण्यात आले आहे. मी त्यांच्या डीएनएचा नमुना दिला आहे. मला आशा आहे की माझ्या मुलीचा मृतदेह सापडेल. माझी आई मेसमध्ये गेली आणि पुन्हा परतलीच नाही. आम्ही कालपासून तिला शोधत आहोत पण ती आम्हाला सापडली नाही', असे रवीने म्हटले आहे. रवीच्या डीएनए नमुन्याचा वापर त्याच्या दोन वर्षांच्या मुलीची ओळख पटवण्यासाठी, तर रवीच्या बहिणीच्या डीएनए नमुन्याचा वापर त्यांच्या आईला शोधण्यासाठी घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Gaikwad: संजय गायकवाडांच्या प्रश्नावर भुजबळांनी हातच जोडले...VIDEO

Jui Bhagwat: झापूक झुपूक अभिनेत्रीचा फिल्मफेअरमधला क्यूट लूक पाहिलात का?

Rainwater Benefits: पावसात भिजण्याचे आरोग्यदायी फायदे! तुम्हाला माहिती आहेत का?

Mumbai Local: रेल्वे प्रवाशांची घोर निराशा! लोकल गर्दी कायम राहणार, शिफ्ट बदलाच्या प्रस्तावाला ८०० कंपन्यांकडून कसा दिला प्रतिसाद?

Pune-Nashik Railway : पुणे-शिर्डी-नाशिक रेल्वे मार्गाबाबत मोठी अपडेट; डीपीआर पूर्ण, प्रस्ताव केंद्राकडे जाणार!

SCROLL FOR NEXT