Mumbai News : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! वीज बील स्वस्त होणार? मुंबईत वीज वितरण परवान्याची महावितरणची मागणी

Mumbai Latest News : मुंबईत वीज वितरण परवान्याची परवानगी मिळावी अशी मागणी महावितरणकडून करण्यात आली आहे. सध्या मुलुंड आणि भांडुप या ठिकाणी महावितरणद्वारे वीज पुरवठा सुरु आहे.
Mumbai Electricity News
Mumbai Electricity Newsx
Published On

गणेश कवडे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Mumbai : मुंबईतील वीज ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत वीज वितरण परवान्याची मागणी महावितरणकडून करण्यात आली आहे. मुंबई शहरातील कुलाबा ते माहीम, पश्चिम उपनगरात बांद्रा ते दहिसर, पूर्व उपनगरात विक्रोळी ते चुनाभट्टी आणि मानखुर्द तसेच चेना व काजुपाडासह मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात परवाना मिळवण्यासाठीची याचिका आयोगाकडे दाखल करण्यात आली आहे.

मुंबईत बेस्ट ही सार्वजनिक कंपनी आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड व टाटा पॉवर मुंबई या दोन खासगी कंपन्यांकडून वीज पुरवठा केला जातो. तर मुंबई शहरातील मुलुंड व भांडुप या दोन उपनगरात महावितरणाद्वारे वीज पुरवठा होतो. मुंबईतील उर्वरित भागांमध्ये देखील वीज पुरवठा करण्याचा परवाना मिळावा अशी मागणी महावितरणद्वारे करण्यात आली आहे.

Mumbai Electricity News
Pune Accident : पुण्यात भीषण अपघात, भर रस्त्यात वेगात येणाऱ्या कारनं चिरडलं अन्...; लेकीची वाट पाहणाऱ्या कुटुंबाचा मन हेलावणारा आक्रोश

राज्यातील विजेची गरज भागवण्यासाठी महावितरणकडून "रिसोर्स ॲडेक्वसी प्लॅन" प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत महावितरणकडे पुरेशी वीज उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील वाढती मागणी पूर्ण करताना आता मुंबईसारख्या महानगरालाही वीज पुरवठा करण्याची क्षमता निर्माण झाली आहे.

Mumbai Electricity News
Mumbai Mega Block : मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? कसा कराल प्रवास? वाचा वेळापत्रक

सध्या महावितरणकडून दररोज सुमारे २६ हजार मेगावॅट वीज पुरवली जात आहे. तर मुंबईची दररोज ४ हजार मेगावॅट वीज पुरवठा आवश्यक आहे. जर महावितरणकडून मुंबईतही थेट वीज पुरवठा सुरू झाला, तर ग्राहकांना याचा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. विविध खासगी वितरण कंपन्यांच्या तुलनेत महावितरणकडून मिळणाऱ्या विजेचे दर कमी असल्याने मुंबईतील वापरकर्त्यांना स्वस्त वीज मिळू शकते.

Mumbai Electricity News
Gautam Gambhir ने अचानक सोडली भारतीय संघाची साथ, तडकाफडकी घेतला मायदेशी परतण्याचा निर्णय; कारण...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com