Air India crash aftermath: UK families shocked as wrong dead bodies sent from India Saam
देश विदेश

Air India Plane Crash: एअर इंडियाचे संतापजनक कृत्य! ब्रिटनमध्ये मृतदेहांची अदलाबदली, कुटुंबीय संतप्त

Air India Plane Crash Victims Bodies: एअर इंडिया विमान अपघातात मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांसोबत थट्टा झालीय. ब्रिटनमध्ये पीडितांच्या कुटुंबियांना दुसऱ्याचे मृतदेह देण्यात आले.

Bharat Jadhav

  • अहमदाबादमधील एअर इंडिया अपघातात ब्रिटिश प्रवाशांचा मृत्यू

  • मृतांच्या नातेवाईकांना चुकीचे मृतदेह पाठवल्याचा आरोप

  • काही मृतांची चुकीची ओळख करून देण्यात आल्याची माहिती

  • नातेवाईकांनी व्यक्त केला तीव्र संताप; चौकशीची मागणी

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमान अपघातात ब्रिटेनमधील काही प्रवाशांचा मृत्यू झाला होता. ब्रिटेनमधील त्यांच्या नातेवाईकांना प्रवाशांचे मृतदेह देण्यात आले, पण मृतांची अदलाबदली झाल्यानं मृतांच्या नातेवाईकांना संताप व्यक्त केलाय. चुकीच्या पद्धतीने मृतदेह पीडितांच्या कुटुंबियांना पाठवले गेले, असं एका ब्रिटीश कुटुंबाने सांगितलंय. एवढेच नाही तर काही मृत प्रवाशांची चुकीची ओळख पटवून नंतर त्यांना ब्रिटनला पाठवण्यात आल्याचेही समोर आले आहे.

चुकीचे मृतदेह दिल्यानं कुटुंबियांनी पार्थिवावर अत्यंविधी केल्या नाहीत. ब्रिटिश वृत्तपत्र मिररने एक धक्कादायक खुलासा केला की, एकाच शवपेटीत एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या मृतदेहाचे अवशेष ठेवण्यात आले होते. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय.

दरम्यान अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला होता. यात २६१ जणांचा मृत्यू झाला होता. अपघातग्रस्त विमान गुजरातहून लंडनला जात होते. या विमानात ब्रिटेनचे ५२ प्रवाशी होते. दरम्यान दोन घटनेत मृतांच्या कुटुंबियांना चुकीचे मृतदेह देण्यात आल्याचे समोर आले.

दरम्यान मृतदेहांची अदलाबदली झाल्याची घटना एका डॉक्टरने उघडकीस आणली. डॉक्टर फिओना विल्‍कोक्‍सने ब्रिटिश नागरिकांचे आणि मृतदेहाचे डीएनए जुळवत असताना मृतदेहांची अदलाबदली झाल्याची बाब समोर आली. विमान वाहतूक प्रकरणे हाताळणारे वकील जेम्स हेली प्रॅट म्हणाले की, पीडितांच्या कुटुंबियांना सुरुवातीला त्यांच्या नातेवाईकांचे मृतदेह परत मिळावेत अशी इच्छा होती.

परंतु काही मृतदेहांमध्ये चुकीच्या लोकांचे मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे पीडितांच्या कुटुंबियांना या घटनेमुळे नाराजी व्यक्त केलंय. मला वाटते की पीडितांच्या कुटुंबियांना ही चूक समजावून सांगण्याची गरज आहे. मिळालेल्या माहितीनुसार ब्रिटेनचं पंतप्रधान कीर स्टार्मर हे पंतप्रधा मोदींच्या ब्रिटेन दौऱ्यादरम्यान हा मुद्दा उपस्थित करतील.

एअर इंडिया अपघात कुठे झाला?

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडिया विमानाचा अपघात झाला होता.

कोणत्या देशातील प्रवाशांचा या अपघातात मृत्यू झाला?

या अपघातात ब्रिटनमधील काही प्रवाशांचा मृत्यू झाला.

मृतांच्या नातेवाईकांनी कोणती तक्रार केली आहे?

नातेवाईकांनी आरोप केला की, मृतांची अदलाबदल झाली असून चुकीचे मृतदेह त्यांना पाठवले गेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज संपूर्ण विदर्भात पावसाचा अलर्ट

Surya Gochar: 10 वर्षांनी सूर्य करणार बुध ग्रहाच्या नक्षत्रामध्ये बदल; 'या' 3 राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु

Mobile Tips: तुमचा जुना फोन होईल अगदी नवीन, फॉलो करा 'हे' सोपे टिप्स

Nagpur News : बस अडवून खिडकीवर चढला, प्रवाशांना मारहाण; अर्धनग्न होत तरुणाचा भररस्त्यात राडा, शेवटी....

बिबट्या दबक्या पावलांनी शिरला गोठ्यात, शिकारीवर झडप टाकणार तेवढ्यात शेतकऱ्याने शिकवला धडा

SCROLL FOR NEXT