Air India Plane Crash x
देश विदेश

Air India Plane Crash : माझ्या अंतरात्म्यानं सांगितलं की जाऊ नको... जे विमान कोसळलं, त्याचं तिकीट केलं कॅन्सल; प्रवाशानं मानले देवाचे आभार

Ahmedabad Plane Crash : अहमदाबादच्या मेघानी नगर येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले. या विमानाचे तिकीट एका व्यक्तीने आयत्या वेळी कॅन्सल केले. यामुळे त्या प्रवाशाचे प्राण वाचले.

Yash Shirke

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. विमानाने टेकऑफ केले, ७०० फूटावर गेल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये विमान खाली कोसळले. अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात विमान कोसळले. अपघात झाल्यानंतर लगेचच पोलीस, आपत्कालीन पथके घटनास्थळी पोहोचले.

अपघातग्रस्त एअर इंडियाच्या विमानात सावजीभाई टिंबडिया नावाचे प्रवासी लंडनला जात होते. पण काही कारणांमुळे त्यांनी प्रवास न करण्याचा निर्णय घेतला. 'माझा मुलगा लंडनमध्ये राहतो. मी त्याला भेटायला निघालो होतो. पण आजचा दिवस मला आवडला नाही म्हणून मी तिकीट कॅन्सल केले आणि पुढच्या सोमवारचे तिकीट बुक केले', अशी माहिती सावजीभाईंनी माध्यमांना दिली.

'मला तीन-चार दिवसांनी जायचे आहे. मी सोमवारच्या फ्लाइटचे तिकीट बुक केले आहे. आज जाणाऱ्या विमानाचे तिकीट देखील माझ्याकडे होचे. पण आज मला जावेसे वाटत नव्हते. आतून आवाज आला की आज जाऊ नको. मला वाटले आजचा दिवस चांगला नाही. म्हणून मी आज विमानाने प्रवास न करण्याचा निर्णय घेतला, माझा सीट नंबर ए१ होता', अशी वक्तव्य सावजीभाई टिंबडिया यांनी केले.

सावजी टिंबडिया म्हणाले, 'मला कळले आजच्या ज्या विमानाचे तिकीट माझ्याकडे होते, त्या विमानाचा अपघात झाला. मी एकटाच लंडनला जाणार होता. मला स्वामी नारायणाने वाचवले आहे. मी भगवान स्वामी नारायणाचा भक्त आहे. मी दररोज मंदिरात जातो. त्यांच्यामुळे माझे प्राण वाचले, मी आता पुढच्या सोमवारी मुलाकडे जाईन.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अभिजीत दिपके दिल्लीत धडकणार, 10 मुंबईतील आंदोलनानंतर CJPचा 'प्लॅन बी'

Maharashtra News Live Update: सर्व रिपब्लिकन पक्ष एकत्र आले तर आमची ताकद वाढेल: रामदास आठवले

14 पोलीस आयुक्तांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

AIच्या युगात मराठीची नवी ओळख; फडणवीसांनी सांगितला भाषेच्या विस्ताराचा रोडमॅप

Homemade lip balm : महागडे लिप बाम कशाला? घरच्या घरी बीटपासून बनवा नॅचरल लिप बाम; ओठ राहतील मऊ अन् गुलाबी

SCROLL FOR NEXT