Air India Flight crash Saam tv
देश विदेश

Air India Flight crash : २४२ प्रवासी, लंडनसाठी टेक ऑफ घेताच १० मिनिटांत कोसळलं; नेमका अपघात कसा झाला?

Air India Flight crash update : गुजरातच्या अहमदाबादमध्ये २४२ प्रवाशांनी भरलेले विमानाचा अपघात झाला. टेक ऑफ घेताच १० मिनिटात अपघात झाला.

Vishal Gangurde

गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. विमान क्रॅश होताच आकाशात काळ्या धुरांचे लोट पसरू लागले. अहमदाबाद विमानतळावरून विमान टेक ऑफ घेताच अपघात झाला. या विमानात एकूण २४२ प्रवासी होते. अहमदाबाद पोलिसांच्या कंट्रोल रुमने याबाबत दुजोरा दिला आहे. विमान अहमदाबादहून लंडनला निघालं होतं. मात्र, विमानतळावरून टेक ऑफ घेताच मेघानीनगर परिसरात क्रॅश झालं.

विमानतळाहून मेघानीनगर हे १५ किलोमीटर दूर अंतरावर आहे. घटना घडल्यानंतर अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी तातडीने आग विझविण्याचं काम सुरु केलं. विमान अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विमान अपघातानंतर आकाशात हवेत काळे धूर पसरले आहेत. घटनास्थळी आपत्कालीन प्रतिसाद पथक तैनात करण्यात आलंय. अधिकाऱ्यांनी अद्याप दुर्घटनेचं कारण स्पष्ट केलेलं नाही. अपघातानंतर बीएसएफ आणि एनडीआरएफचं पथके घटनास्थळी पोहोचलं आहे. विमान बोईंग ७८७ ड्रीमलायनर असून ते ११ वर्षे जुने होते.

एअर इंडियाचं विमान AI- 171 दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टहून अहमदाबादला पोहोचलं होतं. त्यानंतर काही वेळ थांबून गुरुवारी दुपारी लंडनला टेक ऑफ घेताच क्रॅश झालं. अग्निशमन दलाचे अधिकारी जयेश खडिया यांनी सांगितलं की, दुर्घटना घडल्यानंतर विमानाला आग लागली. विमानाला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री, भाजपचे वरिष्ठ नेते विजय रुपानी देखील असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एनडीआरएफने ९० कर्मचाऱ्यांची एकूण तीन पथके घटनास्थळी पाठवले आहेत. वडोदराहून आणखी तीन पथके पाठवण्याचा विचार केला जात आहे.

एअर इंडियाचे प्रवक्त्यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलं की, 'विमान अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळावर जाण्यासाठी निघालं होतं. मात्र, हे विमान अहमदाबादहून टेक ऑफ घेताच अपघात झाला. या दुर्घटनेत नेमकं किती नुकसान झालं, याची अधिकृत माहिती आलेली नाही. आम्ही लवकरात लवकर याविषयी माहिती देऊ. आमचं पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. अहमदाबाद एअरपोर्टचं रनवे २३ हून टेक ऑफ घेताच काही अंतरावर कोसळून स्फोट झाला. त्यानंतर विमानाच्या स्फोटाचा मोठा आवाज झाला. त्यानंतर विमानाला आग लागली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Doctor Stress: डॉक्टरही असतात मानसिक तणावात! जाणून घ्या त्यामागची खरी कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Shravan Somwar: श्रावणाचा पहिला सोमवार: महादेवाला अर्पण करा या गोष्टी

Marathwada Politics : काँग्रेसला जोरदार धक्का, २ दिग्गज नेत्यांनी 'हात' सोडला, २४ तासांत कमळ हातात घेणार

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT