Air India Mobile Blast Saamtv
देश विदेश

Air India Mobile Blast: मोठी बातमी! Air Indiaच्या विमानात मोबाईलचा भीषण स्फोट, विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

Air India flight emergency landing: एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाच्या मोबाईलचा स्फोट झाला. यामुळे एकच खळबळ उडाली.

Gangappa Pujari

Air India Flight Latest News: लेकसिटी उदयपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. आज सकाळी एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाच्या मोबाईलचा स्फोट झाला. यामुळे एकच खळबळ उडाली. घटनेनंतर विमानाचे तातडीने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. मोबाईलमध्ये स्फोट झाल्याची ही घटना एअर इंडियाच्या फ्लाइट 470 मध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एअर इंडियाचे (Air India) फ्लाइट क्रमांक-470 उदयपूरहून नियोजित वेळेनुसार दुपारी 1 वाजता निघाले होते. विमानात सुमारे 140 प्रवासी होते. टेकऑफ केल्यानंतर सुमारे 10 मिनिटांनंतर फ्लाइटमधील एका प्रवाशाच्या मोबाईलच्या बॅटरीमध्ये (Mobile Blast) अचानक स्फोट झाला. मोबाईलच्या बॅटरीमध्ये स्फोट झाल्याच्या आवाजामुळे विमानात बसलेले इतर प्रवाशी चांगलेच घाबरले.

त्यानंतर विमानाचे पुन्हा उदयपूरच्या दाबोक विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. उदयपूर विमानतळावर विमान उतरवल्यानंतर त्यातून 3 ते 4 प्रवासी बाहेर पडले. त्या प्रवाशांनी फ्लाइटमध्ये चढण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र नंतर तांत्रिक तपासणीनंतर विमान पुन्हा दिल्लीला पाठवण्यात आले.

या गोष्टी लक्षात ठेवा.... (Tips To Prevent Smartphone Explosion)

ओरिजनल चार्जर - मोबाईलचा वापर करताना तुम्ही ओरिजनल चार्जरचाच वापर करा.

चार्जिंग जास्त करणं -मोबाईलला सूर्यप्रकाशात ठेवून कधीच चार्जिंग करु नका. यामुळे मोबाईल जास्त गरम होऊन त्याचा स्फोट होण्याची जास्त शक्यता असते. बऱ्याचदा चार्जिंग पूर्ण होऊन देखील मोबाईल चार्जिंग करत ठेवला तर तो गरम होतो.

मोबाईल चार्जिंगला लावून बोलणे- बऱ्याचदा कामाच्या गडबडीत मोबाईलला चार्जिंग करणं आपण विसरतो. त्यामुळे अनेकदा आपण मोबाईल चार्जिंग करताना कॉलवर बोलतो. पण हे असं करणं खूपच चूकीचे आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT