Air India flight AI315 suffers technical glitch mid-air, returns safely to Hong Kong with 200+ passengers. Saam TV News
देश विदेश

Air India : दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, पायलटने हवेतच...

Air India Boeing 787 Faces Technical Glitch : एअर इंडिया बोईंग 787-7 विमानात पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. AI315 फ्लाइट ही हाँगकाँगहून दिल्लीला येणारी विमानसेवा असून, विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाडामुळे हाँगकाँगमध्येच परतावे लागले.

Namdeo Kumbhar

Air India Boeing 787 technical problem : एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकदा तांत्रिक अडचण आल्याचे समोर आले आहे. हाँगकाँगहून दिल्लीला येणाऱ्या बोईंग ७८७-७ या विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हे विमान पुन्हा एकदा हाँगकाँगला रवाना झाला आहे. एअर इंडिया बोईंग विमान फ्लाईट क्रमांक एआय ३१५ मध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे परतले आहे. विमानात २०० पेक्षा जास्त प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

हाँगकाँगहून दिल्लीला रवाना झालेले एअर इंडिया फ्लाइटला टेकऑफनंतर काही वेळातच परत हाँगकाँगच्या विमानतळावर परतले. तांत्रिक समस्येमुळे परत यावे लागल्याची माहिती मिळत आहे. बोईंग 787-8 ड्रीमलाइनरद्वारे चालवले जाणारे फ्लाइट AI315 नियोजित वेळेनुसार हॉंगकॉंगहून निघाले होते. पण पायलटला सिस्टममध्ये बिघाडाची शक्यता दिसली. त्यामुळे विमान मध्येच माघारी परतले. विमान सुखरूप हाँगकाँगमध्ये उतरले आणि सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. सध्या विमानाची तपासणी करण्यात येत असून नेमकं कारण शोधलं जात आहे.

अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेची घटनेनंतर जगात खळबळ उडाली होती. त्यानंतर एअर इंडियाच्या सेवेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात झाला होता. फ्लाइट क्रमांक AI171 (बोईंग 787-8 ड्रीमलाइनर) अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे उड्डाण करत असताना टेकऑफनंतर अवघ्या पाच मिनिटांत मेघानी नगर परिसरात एका मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळले. या विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स असे एकूण २४२ जण होते. या भीषण दुर्घटनेत २४१ जणांचा मृत्यू झाला, तर केवळ एक प्रवासी वाचला. विमान ज्या इमारतीवर कोसळलं त्यामधील २३४ जणांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

SCROLL FOR NEXT