Lucknow Airport: २५० हज भाविकांना घेऊन जाणारं विमान थोडक्यात वाचलं, लँडिंगवेळी आग अन् धूराचे लोट

Saudi Airlines Hajj flight fire in Lucknow : सौदी अरेबियातून लखनौला येणाऱ्या हज यात्रेकरूंनी भरलेल्या विमानात लँडिंगदरम्यान भीषण अपघात टळला. या फ्लाइटमध्ये २५० प्रवासी होते. लँडिंगच्या वेळी विमानाच्या डाव्या चाकात तांत्रिक बिघाड झाल्याने ठिणग्या उडाल्या आणि आग लागली.
Saudi Airlines Hajj flight fire in Lucknow
Saudi Airlines Flight SV 3112 faced a wheel fire while landing at Lucknow Airport; 250 Hajj pilgrims evacuated safely.Saam TV News
Published On

Saudi Airlines landing technical glitch : अहमदाबाद येथील भीषण विमान दुर्घटना ताजी असतानाच लखनौच्या चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहाटे मोठा अपघात टळला. सौदी अरबहून हज यात्रेकरूंना घेऊन येणाऱ्या विमानाचा लँडिंगदरम्यान मोठा अपघात टळला. सौदी अरेबिया एअरलाइन्सच्या या विमानात २५० जण प्रवास करत होते. लँडिंगच्या वेळी विमानाच्या चाकात तांत्रिक बिघाड झाल्याने ठिणगी उडाली अन् आग लागली. त्यामुळे चाकामधून धूर येत होता. सुदैवाने, मोठी आग लागली नाही, त्यामुळे दुर्घटना टळली. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

सौदी अरेबिया एअरलाइन्सच्या फ्लाइट SV 3112 मध्ये 250 हज यात्रेकरू घेऊन जेद्दाहवरून लखनऊला आलं होतं. लँडिंगवेळी डाव्या चाकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ठिणग्या उडाल्या अन् आग लागली, त्यामध्ये धूर येऊ लागला. घटनेची माहिती मिळताच पायलटने तात्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोलरला सूचना दिली होती. विमानतळावरील अग्निशमन पथकाने अवघ्या काही मिनिटांत परिस्थिती नियंत्रणात आणली. आग पसरू नये म्हणून फोम आणि पाण्याचा मारा करण्यात आला. लँडिंगनंतर २० मिनिटांच्या प्रयत्नांनंतर परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली. त्यानंतरच प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आलं.

Saudi Airlines Hajj flight fire in Lucknow
Godavari River Tragedy : दर्शनाआधी गोदावरीत अंघोळीसाठी उतरले, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू | VIDEO

या घटनेमुळे विमानतळावर काही काळ तणावाचं वातावरण होतं. पायलट आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठं नुकसान टळलं. विमानाच्या चाकातील तांत्रिक बिघाडाचं कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. लखनौ विमानतळ प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सर्व आवश्यक खबरदारी घेतल्याचं सांगितलं. हवामान आणि तांत्रिक बाबींचा अभ्यास करून पुढील कारवाई केली जाईल, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. टेकऑफदरम्यान ही घटना घडली असती, तर मोठी दुर्घटना घडली असती, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Saudi Airlines Hajj flight fire in Lucknow
Bus Accident : पहाटे काळाचा घाला, शिर्डीकडे जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू, ८ जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com