Mehboob Ali murder, Hyderabad murder case 
देश विदेश

Crime : प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या समर्थकाला संपवलं, घराजवळच भयंकर हल्ला; शहरात प्रचंड खळबळ

AIMIM leader murder, Mehboob Ali murder : हैदराबादमध्ये AIMIMचे स्थानिक पदाधिकारी महबूब अली यांची घरापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर अज्ञातांनी धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या केली. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Mehboob Ali murder, Hyderabad case : हैदराबादमधील AIMIM पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याची अज्ञातांनी भोसकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. AIMIM पक्षाचे महबूब अली हे त्यांच्या घरापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर होते. त्याचवेळी अज्ञातांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण हैदराबाद शहरात प्रचंड खळबळ उडाली असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महबूब अली हे रात्रीच्या सुमारास आपल्या घराच्या दिशेने जात होते. ते घराच्या अगदी जवळ पोहोचले असताना आधीच दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यात घेरले. काही समजण्याच्या आतच हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने एकापाठोपाठ एक सपासप वार केले. महबूब अली हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला.

घटनास्थळीच दुर्दैवी अंत:

वार इतके प्राणघातक होते की, महबूब अली गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले. हल्ल्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक आणि नातेवाईक मदतीसाठी धावले. पण तोपर्यंत आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले होते. अतिरक्तस्त्रावामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.

पोलीस ॲक्शन मोडवर, जुन्या वैमनस्याचा संशय:

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या पथकासह घटनास्थळी भेट दिली आणि परिसर सील करून पंचनामा केला. मृतदेह पोस्टमार्टमसाठी स्थानिक शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

ही हत्या जुन्या राजकीय वैमनस्यातून झाली, वैयक्तिक वादातून की अन्य काही कारणास्तव? याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींचा सुगावा लावण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले जात आहेत. पोलिसांनी विविध पथके तयार करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT