Asaduddin Owaisi Emotional Saam Tv
देश विदेश

'तुमच्या जुलुमांना घाबरणार नाही...'; भाषण सुरू असताना स्टेजवरच ओवैसी रडले

Asaduddin Owaisi Emotional : शुक्रवारी हैदराबादमध्ये (Hyderabad) नमाज पढल्यानंतर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी भावूक झाले आणि भाषणादरम्यान त्यांना रडू कोसळलं.

साम टिव्ही ब्युरो

हैदराबाद: सध्या देशभरात मुस्लिमांवर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहे. त्यातच मशिद, भोंगा आणि हनुमान चालिसा, हा वाद देखील गाजत आहे. मुस्लिमांवर वाढत्या अत्याचाराबाबत ओवैसींनी (Asaduddin Owaisi) दु:ख व्यक्त केलं आहे. शुक्रवारी हैदराबादमध्ये (Hyderabad) नमाज पढल्यानंतर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी भावूक झाले आणि भाषणादरम्यान त्यांना रडू कोसळलं. (AIMIM Leader Asaduddin Owaisi Emotional Speech After Namaz Hits At Bjp)

भाषणादरम्यान ओवैसी म्हणाले की, खरगोनमध्ये (Khargone) मुस्लिमांच्या घरांची तोडफोड करण्यात आली. तसेच जहांगीरपुरीतील मुस्लिमांवर भयंकर अत्याचार झाले, येथील मुस्लिम दुकानदारांची दुकानं उद्ध्वस्त करण्यात आली. मुस्लिमांवरील या अत्याचाराचं मला खूप दु:ख होत आहे. मी अत्याचार करणाऱ्यांना एक गोष्ट सांगतो की, आम्ही मुस्लिमांवरील अत्याचार कदापि सहन करणार नाही. कारण, आम्ही मृत्यूला आणि तुमच्या राजवटीला कधीच घाबरत नाही. यापुढं आम्ही संयमानं काम करू आणि मैदान सोडणार नाही, असा इशारा ओवैसींनी दिलाय.

हैदराबादमध्ये नमाज पढल्यानंतर ओवैसींनी मुस्लिम बांधवांसोबत संवाद साधला. या संवादादरम्यान ते भावूक झाले. देशात एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ओवैसी म्हणाले की, माझ्या नजरेसमोर अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यात थेट एका विशिष्ट धर्माच्या लोकांवर कारवाई झाली. भाषणादरम्यान अनेक वेळा ओवेसींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. अल्पसंख्याकांवरील कारवाईमुळे ते संतप्त झाले होते.

नुकतंच राजस्थानमधील अलवर येथील 300 वर्षे जुने मंदिर पाडल्याप्रकरणी ओवेसी यांनी भाजपला घेरलं होतं. ओवैसी यांनी या घटनेचा निषेध करत भाजपला चांगलंच सुनावलं होतं. 'राजस्थानमधील राजगढमधील प्राचीन मंदिर पाडणे हा भाजपशासित महापालिका मंडळाचा निषेधार्ह निर्णय आहे. आम्ही सर्व धर्मांच्या धर्म स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतो हे गंभीर उल्लंघन आहे. सर्व प्रार्थनास्थळांवर झालेल्या हल्ल्याबद्दल भाजप-आरएसएस माफी मागतील' असं ओवैसी यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकच्या निफाड तालुक्यातील गावांना पावसाचा फटका

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT