अहमदाबादमध्ये पत्नीने पतीवर उकळते पाणी आणि अॅसिड ओतून हल्ला केला.
३३ वर्षीय डिलिव्हरी कामगार गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल.
प्रेमसंबंधांच्या संशयावरून वारंवार वाद होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे.
आरोपी पत्नीविरुद्ध एफआयआर दाखल करून तपास सुरू.
गुजरातमधील अहमदाबाद शहरात घडलेली एक भीषण घटनेने समाजाला हादरवून टाकले आहे. घरगुती हिंसाचाराचे अनेक प्रकार ऐकले असले तरी या वेळेस पतीवरच अत्याचार झाला आहे. अहमदाबाद सॅटेलाईट परिसरात राहणाऱ्या ३३ वर्षीय डिलिव्हरी कामगारावर त्याच्याच पत्नीने उकळते पाणी आणि अॅसिड ओतून गंभीर जखमी केले. हा तरुण सध्या सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जीवासाठी झुंज देत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महिलेला तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असत. घटनेच्या दिवशी मध्यरात्री पती झोपलेला असताना पत्नीने अचानक त्याच्यावरचे ब्लँकेट ओढून घेतले आणि उकळते पाणी ओतले. नंतर तिने अॅसिड फेकून त्याला भाजले. यात त्याच्या पोट, पाठ, मांड्या, हात आणि गुप्त भागांना गंभीर दुखापत झाली आहे.
जखमी अवस्थेत असतानाच पीडिताने रुग्णालयाच्या बेडवरून पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यात त्याने पत्नीकडून झालेल्या अत्याचाराचे संपूर्ण वर्णन केले आहे. हल्ल्यानंतर आरोपी पत्नी घरातून पळून गेली असून पोलिसांनी तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
तपासात उघड झाले की या दाम्पत्याने दोन वर्षांपूर्वी कोर्ट मॅरेज केले होते आणि दोघांसाठी हे दुसरे लग्न होते. आरोपी महिलेला तिच्या पहिल्या नवऱ्याचा सहा वर्षांचा मुलगा आहे. सद्य नवऱ्याने या महिलेशी लग्न करण्यासाठी पहिल्या बायकोला घटस्फोट दिला होता. मात्र विवाहानंतर त्यांच्या नात्यात सतत अविश्वास आणि भांडणाचे वातावरण राहिले. पोलिसांनी सांगितले की, नवरा-बायकोमध्ये यापूर्वीही वादाच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या होत्या. सध्या आरोपीचा शोध सुरू असून स्थानिक पोलिस तपासात गुंतले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.