अहमदाबादमधील हत्याकांड उघड
मृतदेह घराच्या स्वयंपाकघरातील जमिनीखाली आढळला.
गुन्हे शाखेनं तपास करून प्रकरणाचा उलगडा केला.
अहमदाबादमधील सरखेज फतेवाडी कालवा परिसरात घडलेल्या एका वर्षापूर्वीच्या हत्याकांडाचा उलगडा झालाय. बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध घेताना पोलिसांनी धक्कादायक हत्याकांड उघकीस आणलाय.
एका महिलेनं आपल्या नवऱ्याची हत्या करून स्वयंपाक घरात त्याचा मृतदेह पुरला होता. पोलिसांना याचा उलगडा एका वर्षानंतर झालाय. आधी या महिलेने नवरा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, समीर बिहारी नावाच्या व्यक्तीची त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर इम्रान अकबरभाई वघेला यांनी हत्या केली होती. समीर बिहारी याचा मृतदेह घरात पुरला.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, मृत समीर बिहारीचं खरं नाव मोहम्मद इस्रायल अकबर अली अन्सारी होते. तो अहमदाबादमध्ये गवंडी म्हणून काम करत होता. गेल्या अनेक वर्षांपासून विविध बांधकाम ठिकाणी राहत होता.
गेल्या ५ वर्षांपासून तो त्याची पत्नी रूबी आणि दोन मुलांसह सरखेज फतेवाडी कालव्याजवळ असलेल्या ए-६, अहमदी रो हाऊस येथे राहत होता. त्याचे मूळ गाव बिहारमधील सिवान जिल्ह्यातील रामपूर गाव आहे. २०१५-२०१६ मध्ये त्याने रूबीशी प्रेमविवाह केला होता त्यामुळे त्याने गाव सोडले होते.
समीर बिहारी एक वर्षापूर्वी बेपत्ता झाला होता, अशी तक्रार त्याची पत्नी रुबी हिने पोलिसांत केली होती. घरात वाद झाला आणि समीर घराबाहेर पडला त्यानंतर घरी परतलाच नाही, अशी तक्रार तिने पोलिसांत एका वर्षापूर्वी दिली होती. मात्र गेल्या काही महिन्यांतील महिलेचे वागणं आणि तिचे वक्तव्य पोलिसांना संशयास्पद वाटू लागले.
ज्यामुळे पोलिसांनी पुन्हा तपास सुरू केला. या तपासादरम्यान पोलिसांना हत्याकांडाचा कळला. रुबी आणि तिचा प्रियकर इम्रान यांनीच समीरचा खून केला होता. या दोघांचे प्रेमसंबंध होते, मात्र याचे नाते समीरला आवडत नव्हते. आपल्या प्रेमात आणि आपल्याला एक होऊ देण्यात समीर अडथळा ठरत असल्यानं रूबी अन् इम्राननं समीरच्या हत्येचा कट आखला.
पोलिसांनी सांगितले की, या दोघांनी समीरचा गळा दाबला त्यानंतर चाकूने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर त्यांनी मृतदेहाचे तुकडे केले आणि स्वयंपाकघरात खड्ड्या करून त्यात पुरले. दुसऱ्या दिवशी रुबीने त्यावर टाइल्स बसवून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेनं मृतदेहाचा शोध घेतला. फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या पथकांनी घरात खड्डा खोदून मानवाचा सांगाडा बाहेर काढला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.