अहमदाबादमध्ये एका दहावीतल्या विद्यार्थिनीने शाळेत आत्महत्या केली.
शाळेच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन विद्यार्थिनीने उडी मारली.
या घटनेनंतर तिला नवरंगपूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
उपचारादरम्यान शाळकरी मुलीचा मृत्यू झाला.
Shocking : इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने तिच्या शाळेत आत्महत्या केली. या १५ वर्षीय मुलीने शाळेच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन खाली उडी मारली. त्यानंतर उपचारांसाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. आत्महत्या करण्याची घटना शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही मुलगी हातात कीचेन फिरवत लॉबीमध्ये चालत जाताना दिसते. अचानक रेलिंगवरुन उडी मारल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. सदर घटना गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने गुरुवारी (२४ जुलै) दुपारी १२.२७ वाजता शाळेच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारली. तिच्या मैत्रिणीने तिला रोखण्याचा प्रयत्न केला. उडी मारणाऱ्या मुलीच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर मुलीला नवरंगपुरा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आयसीयूमध्ये तिच्यावर उपचार सुरु होते. काही कारणास्तव दुसऱ्या रुग्णालयात तिला हलवले जाणार होता. पण काल (२५ जुलै) रात्री १० च्या सुमारास तिचा मृत्यू झाला.
'मृत मुलगी तिच्या आईवडिलांसह नारनपुरा येथे राहत होती. तिचे वडील गांधी रोडवर चष्म्यांचे दुकान चालवतात. या अपघाताच्या वेळी तिचे कुटुंबीय राजस्थानमधील त्यांच्या मूळ गावी गेले होते. ते अहमदाबादला परतल्यानंतर त्यांची चौकशी केली जाईल', अशी माहिती नवरंगपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ए.ए.देसाई म्हणाले.
प्राथमिक माहितीनुसार, आत्महत्या करणारी मुलगी ही महिनाभराच्या वैद्यकीय रजेनंतर १५ दिवसांपूर्वी शाळेत परतली होती. शाळेत पुन्हा रुजू होण्यापूर्वी तिच्या आईवडिलांनी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले होते. त्या दिवशी सकाळी ती मुलगी अस्वस्थ वाटली, ती वर्गात ओरडू लागली होती. एका शिक्षिकेने तिला शांत केले, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका लीना अरोरा यांनी केले.
घटनेनंतर एफएसएल टीम घटनास्थळी फॉरेन्सिक तपासणीसाठी पोहोचली. पोस्टमॉर्टेम करण्यात आला असून रिपोर्टची यायची पोलीस वाट पाहत आहेत. आत्महत्येच्या प्रयत्नामागील कारण शोधण्यासाठी नवरंगपुरा पोलिसांनी शिक्षक आणि मुलीच्या कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. शहराच्या जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेकडून या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.