Teacher (संग्रहित छायाचित्र) Saam TV
देश विदेश

Teachers News : महिला शिक्षिकेचा प्रताप; नोकरी गुजरातमध्ये, ८ वर्षांपासून अमेरिकेत करतेय मौज, वर्षातून एकदा...

Teachers News : अमेरिकेत बसून 8 वर्ष घेतेय पगार; गुजरातमधील एका सरकारी शाळेतील महिला शिक्षिकेचा 'प्रताप' उघड झालाय.

Namdeo Kumbhar

Gujrat Teachers News : गुजरातमधून एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. गुजरातमधील एका सरकारी महिला शिक्षिका मागील आठ वर्षांपासून अमेरिकेत (US) बसून पगार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांना (student) काहीही न शिकवता ही महिला शिक्षिका मागील आठ वर्षांपासून बक्कळ पगार घेत असल्याचं वास्तव समोर आलेय. महिला शिक्षिकेचा 'प्रताप' उघड झाल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. गुजरातमधील बनासकांठा येथील अंबाजी येथील सरकारी शाळेतील महिला शिक्षिकेचा हा धक्कादायक प्रताप समोर आलाय.

गुजरातमधील (Gujrat News) बनासकांठा येथील अंबाजी येथील सरकारी प्राथमिक विद्याल्यातील महिला शिक्षिकेच्या प्रतापाची सध्या देशभरात चरचा सुरु आहे. त्या महिला शिक्षिकेचं नाव भावनाबेन पटेल असल्याचं समोर आलेय. मागील आठ वर्षांपासून भावनाबेन पटेल या अमेरिकेत राहत आहेत. त्या वर्षातून एकदा भारतात येतात, पगार घेतात अन् पुन्हा अमेरिकेत जातात, असं वास्तव समोर आलेय.

वर्षातून एकदा भारतात -

सरकारी प्राथमिक विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यकरत असणाऱ्या भावनाबेन पटेल यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. मागील आठ वर्षांपासून त्या अमेरिकेत वास्तव्यस असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यत आला आहे. त्या पाचवीच्या वर्ग प्रमुख असल्याची नोंद अजूनही कागदपत्रावरुन दिसतेय. मिळालेल्या माहितीनुसार, भावनाबेन पटेल यांच्याकडे ग्रीन कार्डही आहे. भावनाबेन पटेल या वर्षातून एकदा गुजरातमध्ये येतात, अन् लाखो रुपयांची पगार घेतात. भावनाबेन पटेल या शाळेत येत नसल्यामुळे अनेक विद्यार्थींचं शिक्षण प्रभावित होत असेल.

कठोर कारवाई करण्यात येईल -

भावनाबेन पटेल यांचं हे प्रकरण गुजरातसह देशभरात गाजलं. त्यानंतर शिक्षण मंत्र्यांकडून कारवाईचे संकेत देण्यात आले. गुजरातचे शिक्षण मंत्री कुबेर डिंडोर म्हणाले की, चालू ड्युटीवर असताना विदेशात राहणाऱ्या सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट मागवण्यात आला आहे. त्या सर्वांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. त्याशिवाय राज्यातील सर्व शाळांची तपासणी करण्यात येईल, दोषी आढळणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: 'या' राशीला मिळणार राजयोग,५ राशींवर राहणार देवाची कृपा; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : प्रेमाचे रूपांतर विवाहात होईल, तर काहींच्या अंगावर येतील अनेक जबाबदाऱ्या, तुमची रास यात आहे का?

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT