Nila Vikhe Patil elected to Swedish Parliament 
देश विदेश

Nila Vikhe Patil : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत खासदार

महाराष्ट्राशी घट्ट नाते असलेल्या नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत निवड झाली आहे. ग्रीन पार्टीच्या नीला यांनी स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

Namdeo Kumbhar

Nila Vikhe Patil elected to Swedish Parliament : महाराष्ट्रातील राजकीय आणि सहकार क्षेत्रातील दिग्गज विखे पाटील कुटुंबाची नवी ओळख आता जागतिक पटलावर कोरली गेली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटल यांची पुतणी नीला विखे पाटील या स्वीडनमध्ये खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. स्टॉकहोम शहर मतदारसंघातून त्यांनी खासदारकीची निवडणूक जिंकली आहे. ग्रीन पार्टीच्या नेत्या असलेल्या नीला यांनी यापूर्वी राजकीय सल्लागार आणि नगरसेविका म्हणून काम पाहिलंय. तर आता संसदेत मुलांचे कल्याण आणि पर्यावरण रक्षणावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितलेय.

सहकार महर्षींचा वारसा सातासमुद्रापार

नीला विखे पाटील यांना राजकारणाचे आणि समाजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले आहे. त्या आशियातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पणती, तर माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आहेत. स्वीडनच्या ३४९ सदस्यांच्या संसदेत निवडून येणाऱ्या त्या भारतीय वंशाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक ठरल्या आहेत.

अहिल्यानगरशी घट्ट नाते अन् उच्च शिक्षण

नीला यांचा जन्म जरी स्वीडनमध्ये झालेला असला, तरी त्यांचे बालपण आणि सुरुवातीचे शिक्षण अहिल्यानगर येथे झाले आहे. त्यांनी शिक्षणातही मोठी उत्तुंग भरारी घेतली आहे. गोथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र आणि कायद्याची पदवी, तसेच एमबीए (MBA) चे शिक्षण घेतले आहे.

माजी पंतप्रधानांच्या राहिील्या आहेत राजकीय सल्लागार

नीला विखे पाटील या स्वीडनमधील 'ग्रीन पार्टी' (Green Party) च्या अत्यंत सक्रिय आणि वजनदार नेत्या मानल्या जातात. लोकप्रतिनिधी होण्यापूर्वी त्यांनी स्वीडनचे माजी पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांच्या कार्यकाळात पंतप्रधान कार्यालयात 'विशेष राजकीय सल्लागार' म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. या काळात त्यांनी वित्त, करप्रणाली आणि गृहनिर्माण यांसारखे महत्त्वाचे विषय यशस्वीपणे हाताळले आहेत. त्यासोबतच त्या स्टॉकहोम महानगरपालिकेच्या नगरसेविका म्हणूनही कार्यरत होत्या.

१५व्या वर्षी आजोबांनी अर्थसंकल्प वाचायला लावला होता

विजय घोषित झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना नीला म्हणाल्या, "स्वीडनच्या संसदेत देशाचे आणि स्टॉकहोम शहराचे प्रतिनिधित्व करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मला माझ्या आजोबांना (बाळासाहेब विखे पाटील) अभिमान वाटेल असेच काम करायचे आहे. मी जेव्हा १५ वर्षांची होते, तेव्हा त्यांनीच मला राज्याचा अर्थसंकल्प वाचायला लावला होता आणि तिथूनच माझ्या राजकीय प्रवासाची पायाभरणी झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जंतर मंतरवर राजकीय नेत्यांची धरपकड; 4 माजी मुख्यमंत्री दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

नाशिकमधील धक्कादायक घटना; 22 मृत रुग्णांवर 6 वर्षानंतर उपचार; 3 हॉस्पिटल्सनं शासनाला लावला 2 कोटींचा चुना

Maharashtra News Live Update: मुंबईत ताब्यात घेतलेल्या ६०० आंदोलकांची सुटका

Chaniya Choli Designs: गरबा नाईटमध्ये सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळतील! ट्राय करा हे ७ चनिया चोळी डिझाइन्स

महायुतीवर संकट; फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याविरोधात मराठा शक्ती एकवटली; थेट मुख्यमंत्र्यांकडे राजीनाम्याची मागणी

SCROLL FOR NEXT