Viral Dance Video Saam Tv
देश विदेश

Viral Video: बापरे बाप! या कृषीमंत्र्याच्या डान्सपुढे अल्लू अर्जुनही सपाट; व्हिडिओ पाहाल तर Fan व्हाल

राजकीय नेते हे प्रामुख्याने त्यांच्या भाषणांसाठी, टीका टिप्पनीसाठी ओळखले जातात. पण एखाद्या मंत्र्याने आपल्या डान्सनेच पाहणाऱ्याला थक्क केल तर. अगदी असाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

Viral Video: राजकीय नेते हे प्रामुख्याने त्यांच्या भाषणांसाठी, टीका टिप्पनीसाठी ओळखले जातात. पण एखाद्या मंत्र्याने आपल्या डान्सनेच पाहणाऱ्याला थक्क केल तर. अगदी असाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मंत्री असा धमाकेदार डान्स करतो की, पाहणारा प्रत्येकजण थक्क होऊन जातो.

या व्हिडिओ आंध्रप्रदेशचे कृषीमंत्री अंबाती रामबाबू यांचा असून व्हिडिओमध्ये त्यांचा धमाकेदार डान्स पाहायला मिळत आहे. (Viral Video)

याबाबत अधिक माहिती अशी की, राजकीय लोक अनेकदा कार्यक्रमांमध्ये भाषणे देताना दिसतात. पण मकरसंक्रांतीच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आंध्र प्रदेशातील एका मंत्री आले आणि त्यांनी येथे आपल्या डान्सने सर्वांनाच चकित केले. मंत्र्यांच्या या नृत्याविष्काराने उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले. आंध्रप्रदेशचे कृषीमंत्री अंबाती रामबाबू यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मानकर संक्रांतीनिमित्त आंध्र प्रदेशचे कृषिमंत्री अंबाती रामबाबू एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सत्तेनापल्ली मतदारसंघात पोहोचले. येथे त्यांच्या नेतृत्वाखाली प्रथम होलिका दहन करण्यात आले. त्यानंतर आदिवासी खेळांचे आयोजन करण्यात आले. यावेळी कृषीमंत्र्यांनी पारंपरिक वेशभूषेत कार्यक्रमात उपस्थित कलाकारांपर्यंत पोहोचून त्यांच्यासोबत नृत्यही केले.

त्यांच्या या जबरदस्त डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Instagram) तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तो खूप सुंदर डान्स मूव्हज देत आहे. व्हिडिओत वाजणाऱ्या संगीतानुसार मंत्री नाचताना दिसत आहेत. संपूर्ण आंध्र प्रदेशात भोगी उत्सव साजरा केला जात आहे. सकाळपासूनच लोक बोनफायर, रंगवल्लू, हरिदासू कीर्तन आणि गंगिरेडू विन्यास साजरे करत आहेत.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पुन्हा काँग्रेसमध्ये येणार? संतप्त प्रतिक्रिया देत सर्वच सांगितलं

Height Growth Tips : उंची वाढवण्यासाठी हे विटामिन आहे सर्वात महत्त्वाचं! पालकांनो, आजच मुलांच्या आहारात करा हा बदल

Maharashtra News Live Update: चौकशी पूर्वीच राणा सूर्यवंशी ने रुग्णालयातून ठोकली धूम

Dalimb Benefits: रोज १ वाटी डाळिंब खा; हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत शरीराला मिळतील ७ आरोग्यदायी फायदे

अंत्यसंस्कारावरून परतताना बस अन् ट्रकचा भीषण अपघात; 22 जणांचा मृत्यू, पाहा काळीज पिळवून टाकणारा VIDEO

SCROLL FOR NEXT