Railway Accidnet CCTV Footage  Saam TV
देश विदेश

CCTV Footage : प्रसिद्ध डॉक्टरचं रेल्वे अपघातात निधन; मुलीला सोडवण्यासाठी गेले होते स्टेशनवर, घटनेचा VIDEO समोर

Doctor Death in Railway Accident : प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.लखन सिंग गालव यांचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

प्रविण वाकचौरे

Railway Accident News :

उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शहरातील प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.लखन सिंग गालव यांचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डॉ. लखन सिंह आपल्या मुलीला सोडवण्यासाठी राजा की मंडी स्टेशनवर सोडण्यासाठी आले होते.

आग्रा येथील गलाना रोडवर राहणारे लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. लखन सिंग गालव यांची दुसरी मुलगी लखनऊ येथून एमबीबीएस करत आहे. मुलीला ट्रेनमध्ये बसवून देण्यासाठी ते स्टेशनवर आले होते. मुलीला कोचमध्ये बसवून दिल्यानंतर ते ट्रेनमधून खाली उतरत असताना पाय घसरला आणि ते ट्रेन घाली सापडले. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी 5 नोव्हेंबर रोजी सकाळी डॉ. गालव आपल्या मुलीला महाकौशल एक्स्प्रेसमध्ये बसवण्यासाठी राजा की मंडी स्टेशनवर पोहोचले. त्यांनी आपल्या मुलीला एसी कोचमध्ये बसवले. या रेल्वे स्टेशनवर दोनच मिनिटे ट्रेनचा थांबा होता.

ट्रेन सुरु झाल्यानंतर डॉ. गालव यांनी ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा पाय घसरला आणि ते ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये सापडले. स्टेशनवरील लोकांनी ओरडून ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र थांबली नाही. या अपघातात डॉ. गालव यांचा जागीच मृत्यू झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाकौशल एक्सप्रेस राजा की मंडी स्थानकातून निघाली तेव्हाच मुलीला अपघाताची माहिती मिळाली. आग्रा कॅंट स्टेशनवर ती ट्रेनमधून खाली उतरली. कुटुंबीय देखील अपघाताची माहिती मिळताच काही वेळातच राजा की मंडी स्टेशनवर पोहोचले. डॉ.लखन यांच्या दुःखद निधनाने वैद्यकीय विश्वात शोककळा पसरली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : पुण्यातील काँग्रेसच्या बंडखोर नेत्यांना प्रस्ताव दिला जाणार

Virat Kohli Birthday Special: वॉशरुममध्ये कोणाला पाहून विराटची बोलती बंद झाली होती? वाचा मजेशीर किस्सा

Government Job: केंद्र सरकारच्या या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; १०वी पास तरुण करु शकतात अर्ज; जाणून घ्या सविस्तर

Crime News : खळबळजनक! प्रेमासाठी जिवलग मित्राला संपवलं, स्वत:च्या हत्येचा बनाव रचला; प्रियकर-प्रेयसी फरार!

Viral Video: मित्रांचा काय नेम नसतो! फटक्याच्या डब्ब्यावर बसवलं, वात पेटवली, पुढे काय घडलं ते पाहून थरकाप उडेल

SCROLL FOR NEXT