Viral Car VIdeo
Viral Car VIdeo Saamtv
देश विदेश

Viral Video: प्रसिद्धीसाठी काहीही! तरुणाने रेल्वे प्लॅटफॉर्मवर पळवली कार, धक्कादायक VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप

Gangappa Pujari

Agra Viral Video: सध्या सोशल मीडियाचे प्रत्येकाला वेड लागलेले आहे. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. ही सोशल मीडियावरील प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुण कोणती क्लुप्या करतील ह्याचा काही नेम नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही डोक्याला हात लावालं.

हा व्हायरल व्हिडिओ एका रेल्वे प्लॅटफॉर्मवरील असून एक तरुण चक्क प्लॅटफॉर्मवर कार पळवताना दिसत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, आग्र्यातील एका तरुणाने रेल्वे प्लॅटफॉर्मवर कार चालवल्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर प्लॅटफॉर्मवर कार चालवणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील कुमार असं कार चालवणाऱ्या व्यक्तीचं नाव असून त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी हा व्हिडिओ बनवल्याचं सांगितलं जात आहे. तरुणाच्या या जीवघेण्या स्टंटमुळे अनेकांनी प्लॅटफॉर्मवरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

आग्रा विभागीय कमर्शिअल मॅनेजर प्रशस्ती श्रीवास्तव यांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. ही घटना ८ मार्च रोजी रात्री ११.३० वाजता घडली असून ती सुरक्षेतील त्रुटींमुळे घडल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवाय कार चालवण्यावर रेल्वे कायद्याच्या कलम १५९ आणि १४७ चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यामुळे या घटनेतील तरुणाला प्लॅटफॉर्मवर कार चालवणं चांगलंच महागात पडणार आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, याआधी दोन दिवसांपूर्वी हरियाणाच्या (Hariyana) गुरुग्राममधील एका व्यक्तीने धावत्या कारमधून पैसे फेकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर हा व्हिडीओ समोर आला आहे. तर स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गुरुग्राममधील व्यक्तीला असं कृत्य करण्यास फरझी या वेब सीरिजने प्रेरित केलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT