US President Donald Trump delivers a statement amid rising global tensions following the Venezuela attack. saam tv
देश विदेश

डोनाल्ड ट्रम्पच्या निशाण्यावर भारत?व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर भारताला धमकी

India US Relations: अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यानंतर आता भारतावर निशाणा साधलाय... ट्रम्प यांनी भारताला धमकी का दिली? व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प दबावाचं राजकारण नेमकं का करतायत?

Mruga Vartak

अमेरिकेनं व्हेनेझुएलावर विध्वंसक असा हल्ला केला... या हल्ल्यानंतर अमेरिकेनं लष्कराच्या डेल्टा फोर्सनं व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना कैद केलं... अशातच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट भारताला धमकी दिलीय...

नरेंद्र मोदी हे चांगले व्यक्ती आहेत. त्यांना माहितीय अमेरिकन राष्ट्राध्यक्ष खुश नाहीयत. त्यामुळे मला खुश करणं गरजेच आहे. त्यांनी मास्कोसोबत व्यापार सुरु ठेवल्यास आम्ही टॅरिफ वाढवू"

मात्र एकीकडे व्हेनेझुएलावर अमेरिकेनं हल्ला केलेला असतानाच ट्रम्प यांनी भारताला टॅरिफवरून धमकी नेमकी का दिली?

व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात मोठ्या कच्च्या तेलाचा साठा आहे...त्यामुळे अमेरिका व्हेनेझुएलावरील हल्ल्यातून जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतोय... तसचं तेल पुरवठ्यातील रशिया- ओपेक देशांचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून सुरु आहे...अशातच भारत आपल्या गरजेच्या मोठ्या प्रमाणात तेल रशियाकडून सवलतीच्या दरात विकत घेते, त्यामुळे ट्रम्प अस्वस्थ आहेत... त्यामुळेच भारतावर आणखी 50 टक्के टॅरिफ लादण्याची धमकी ट्रम्प यांनी दिलीय...

अमेरिकेनं पहिल्यांदा टॅरिफ वॉर छेडल्यानंतर भारतानं अमेरिकेच्या शत्रूसोबत जवळीक वाढवली होती... त्यातच आता ट्रम्प यांच्या पोकळ धमकीला भीक न घालता... भारत जागतिक स्तरावरील राजकारणाच्या बुद्धिबळात नेमकी कोणती चाल खेळणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

भारत-कंबोडिया ते व्हिएन्टिन, दररोज व्हायची मारहाण; किडनी विकलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा, काँग्रेस मदतीला धावली

SCROLL FOR NEXT