Kamal Nath Saam Tv
देश विदेश

MP News: मध्य प्रदेशाच्या पराभवानंतर काँग्रेस अ‍ॅक्शन मोडमध्ये, कमलनाथ यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवलं

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशात भाजपच्या दारूण पराभवानंतर काँग्रेस पक्षाने प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांना पक्षाने प्रदेशाध्यक्षपदावरून हटवले आहे. पक्षाने जारी केलेल्या निवेदनात जितू पटवारी यांची मध्य प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे म्हटले आहे.

Satish Kengar

Madhya Pradesh News:

मध्य प्रदेशात भाजपच्या दारूण पराभवानंतर काँग्रेस पक्षाने प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांना पक्षाने प्रदेशाध्यक्षपदावरून हटवले आहे. पक्षाने जारी केलेल्या निवेदनात जितू पटवारी यांची मध्य प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे म्हटले आहे.

कमलनाथ यांच्या कामाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. मध्य प्रदेशातील निवडणूक निकालानंतर लगेचच काँग्रेस अॅक्शन मोडमध्ये आली होती. कमलनाथ यांनी या पदासाठी आपल्या जागी दुसरं सुचवावं, असं पक्षाकडून त्यांना सांगण्यात आल्याचं सूत्रांनी म्हटलं होतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उमंग सिंघारे हे असतील विरोधी पक्षनेते

काँग्रेस कमिटीने जारी केलेल्या आदेशात उमंग सिंघारे हे राज्यातील विरोधी पक्षनेते असतील, असे म्हटले आहे. उमंग सिंघारे हे आदिवासी समजतील नेते आहेत. मध्य प्रदेशातील पराभवानंतर मोठ्या फेरबदलाची चर्चा होती. उमंग सिंघारे यांना विरोधी पक्षनेते बनवून काँग्रेस आदिवासींना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत आहे. हेमंत कटारे यांच्याकडे विरोधी पक्षाचे उपनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

यावेळी काँग्रेसने मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवली होती. जितू पटवारी यांच्याबद्दल सांगायचे तर ते 2013 मध्ये राऊळ मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार झाले होते. ते काँग्रेसचे सचिव आहेत आणि गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारीही होते. ते मध्य प्रदेशात युवक काँग्रेसचे प्रमुख राहिले आहेत. 2018 मध्ये त्यांनी मधु वर्मा यांचा पराभव केला. पटवारी हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जाते. मध्य प्रदेशातील पराभवानंतरच कमलनाथ यांच्याकडून राजीनामा मागितल्याचे बोलले जात होते. मात्र पक्षाने याबाबतच्या चर्चा फेटाळल्या होत्या.

जितू पटवारी यांचा अनुभव लक्षात घेऊन काँग्रेसने त्यांना ही जबाबदारी दिली आहे. तर छत्तीसगडमध्ये चरणदास महंत यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. दीपक बैज यांची राज्यात काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तिन्ही ठिकाणी काँग्रेसला भाजपविरुद्ध दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT