Petrol Diesel Price Today  Saam Tv
देश विदेश

केंद्र सरकारकडून कर कपात; पेट्रोल-डिझेल स्वस्त, जाणून घ्या नवे दर

सकाळी 6 वाजल्यापासून पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती लागू करण्यात आल्या आहेत.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटीमध्ये कपात करण्याचा मोठा निर्णय घटक आहे. या निर्णायानंतर आज पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करण्यात आले. नव्या दरानुसार आज भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशात पेट्रोल प्रति लिटर 9.5 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सकाळी 6 वाजल्यापासून पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती लागू करण्यात आल्या आहेत.

हे देखील पाहा -

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये तर डिझेलचा दर 89.62 रुपये प्रतिलिटर आहे.

जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.52 रुपये प्रतिलिटर मिळत आहे.

मुंबईत पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटरवर कायम आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

सध्या कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये प्रति लिटर आहे, तर डिझेलचा दर 92.72 रुपये प्रति लिटर आहे.

नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर आहे.

पाटणामध्ये पेट्रोलचा दर 107.24 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.04 रुपये प्रति लिटर आहे.

लखनऊमध्येत्यात पेट्रोल 96.57 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 89.76 रुपये प्रतिलिटर मिळत आहे.

उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये असून, डिझेलचा दर 95.92 रुपये इतका आहे.

पुण्यात पेट्रोलाच दर प्रति लिटर 110.95 रुपये आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.44 इतका आहे.

औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 113.03 रुपये तर डिझेलचा दर 98.95 इतका आहे.

नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.83 रुपये इतका आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 96.29 रुपये इतका आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुरलीधर मोहोळ यांच्यावर कारवाई करावी विजय कुंभार यांची पंतप्रधानांकडे मागणी

Indian Student News : दिवाळी साजरी करताना धाडकन खाली कोसळला, दुबईत १८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; नेमकं काय घडलं ?

Bull Attack : दुचाकींचा पाठलाग करत मोकाट बैलाचा हल्ला; हल्ल्यात लहान मुलगा जखमी, घटना सीसीटीव्हीत कैद

वारंवार अन्न योग्यरित्या पचत नसेल तर काय करावं?

Satara: सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसासह एका व्यक्तीविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT