Shraddha Walkar
Shraddha Walkar Saam TV
देश विदेश

Sharddha Walkar : श्रद्धाची हत्येनंतर आफताबची गोवा टूर; दुसऱ्या मुलीसह गोव्यात मौजमजा

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. आरोपी आफताब श्रद्धाची हत्या केल्यानंतर गोव्यात मौजमजा मारण्यासाठी आला होता. यावेळी त्याच्यासोबत एक दुसरी मुलगी देखील होती. आफताब पुनावाला कळंगुटमधील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये थांबला होता.

आफताबसोबत गोव्यात कोणती तरुणी आली होती याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली नसली तरीही दोघांची ओळख ऑनलाईन झाल्याचं समोर आलं आहे. श्रद्धाच्या हत्येनंतर आफताब ऑनलाईन डेटिंग अॅप्सचा वापर करत वेगवेगळ्या तरुणींसोबत शारीरिक संबंध ठेवत होता.

श्रद्धाच्या हत्येनंतर एक मुलगी अफताबच्या दिल्लीतील महरौली येथील घरी आली होती अशी माहिती पोलिस तपासात समोर आली होती. त्या मुलीचा शोध घेऊन तिची देखील चौकशी पोलिसांनी केली आहे.

आफताबचे अनेक महिलांशी आणि कॉल गर्लशी संबंध होते. क्लाएंट्सकडून पैसे मिळताच आफताब कॉल गर्ल आणि सेक्स वर्कर्सना कॉल करुन त्यांच्यासोबत मौजमजा करायचा अशी माहिती दिल्ली पोलीस दलातील अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

सोमवारी नार्को चाचणी होण्याची शक्यता

सोमवारी आंबेडकर रुग्णालय येथे आरोपी अफताबची नार्को चाचणी होण्याची शक्यता आहे. तसेच शनिवारी त्याची न्यायालयीन कोठडीची तारीख संपत आहे त्यामुळे शनिवारी पुन्हा एकदा त्याला न्ययालयात हजर करून कोठडीत वाढ मिळवण्यासाठी पोलीस मागणी करत आहेत. तसेच अफताबची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली असून अहवाल देखील पोलिसांच्या हाती लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

SCROLL FOR NEXT