Shraddha Murder Case: श्रद्धाच्या हत्येनंतर अफताबच्या घरी आलेल्या मुलीचा पोलिसांना सुगावा; चौकशीत मोठ्या रहस्याचा उलगडा

तसेच शनिवारी त्याची न्यायालयीन कोठडीची तारीख संपत आहे त्यामुळे शनिवारी पुन्हा एकदा त्याला न्ययालयात हजर करून कोठडीत वाढ मिळवण्यासाठी पोलीस मागणी करत आहेत
Shraddha Murder Case
Shraddha Murder CaseSaam TV

Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी दिल्ली पोलीस सातत्याने तपास करत आहेत. अफताबला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस विविध बाजूने या प्रकरणाचा तपास करत आहेत. अशात श्रद्धाच्या हत्येनंतर एक मुलगी अफताबच्या दिल्लीतील महरौली येथील घरी आली होती अशी महिती पोलिसांना समजली तसेच पोलिसांनी त्या मुलीची देखील चौकशी केली आहे. यामुळे या प्रकरणात आता आणखीन खुलासे समोर आले आहेत. (Latest Marathi News)

अफताबने त्या मुलीला श्रद्धाची हत्या केल्यानंतर घरी बोलावले होते. पोलिसांनी या मुलीचा शोध घेऊन तिची बराच वेळ चौकशी केली. यावेळी समजले की, अफताब आणि त्या दुसऱ्या मुलीची ओळख बंबाल या डेटींग अ‍ॅपवर झाली होती. श्रद्धाची हत्या केल्यावर अफताबने या अ‍ॅपद्वारे त्या मुलीशी बोलायला सुरूवात केली. जेव्हा तो तिच्या बरोबर चॅट करत होता तेव्हा श्रद्धाचे शव त्याच्या घरातच होते.

Shraddha Murder Case
Aftab Shraddha Case | आफताब विरोधात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा, पाहा ही ब्रेकिंग न्यूज

अशात काही दिवसांनी त्याने त्या मुलीला घरी बोलाबले ती देखील घरी आली होती. त्यावेळी तिला श्रद्धाचे शव दिसूनये यासाठी अफताबने तिच्या शरीराचे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले होते. अफताबच्या महरौली येथील घरी आलेली ती मुलगी मानसशास्त्रज्ञ आहे. जर वेळीच श्रद्धाचे प्रकरण बाहेर आले नसते तच आणखीन एका मुलीचा अफताबने जीव घेतला असता असे आता अनेक जण म्हणत आहेत.

सोमवारी नार्को चाचणी होण्याची शक्यता

सोमवारी आंबेडकर रुग्णालय (Hospital) येथे आरोपी अफताबची नार्को चाचणी होण्याची शक्यता आहे. तसेच शनिवारी त्याची न्यायालयीन कोठडीची तारीख संपत आहे त्यामुळे शनिवारी पुन्हा एकदा त्याला न्ययालयात हजर करून कोठडीत वाढ मिळवण्यासाठी पोलीस मागणी करत आहेत. तसेच अफताबची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली असून अहवाल देखील पोलिसांच्या हाती लागला आहे.

Shraddha Murder Case
Shraddha Walkar Case | श्रद्धा प्रकरणात ५ वेगवेगळ्या चाकूंचा वापर

आता पर्यंत न मिळालेली उत्तरे लागणार हाती

नुकतीच अफताबची पॉलोग्राफ चाचणी पूर्ण झाली आहे. यात त्याला १५ ते १८ प्रश्न विचारण्यात आले. आता रोहिणी येथील फॉरेन्सीक लॅबमध्ये त्याला पुन्हा हेच प्रश्न (Question) विचारले जाणार तसेच आता पर्यंय त्याने ज्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत ते प्रश्न देखील विचारले जाणार आहेत. काही जाणकारांनी या टेस्ट विषयी म्हटले आहे की, जर त्याने चुकीचे उत्तर दिले तर ते मशिनला लगेचच समजेल आणि त्याला जोरदार झटका बसेल.

श्रध्दाचे संपूर्ण् शव शोधण्यासाठी पोलीस अतोनात प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत त्यांना मैदानगड येथून दोन हाड, तोंडाचा जबडा, दोघांचे कपडे, बाथरूमच्या भिंतीवर लागलेले रक्त यासह त्याने श्रध्दाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी वापरलेले हत्यार ज्या दुकाणातून घेतले त्याचा शोध लागला आहे. त्याने या बीलावर श्रध्दाचा संपर्क क्रमांक दिला होता. इतकेच नाही तर त्याने ज्या फ्रिजमध्ये श्रद्धाचे तुकडे ठेवले होते तो फ्रिज देखील त्याने तिच्याच नावे घेतला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com