ओमिक्रॉननंतर आता कोरोनाच्या आणखी एका व्हेरिएंटचा शोध
ओमिक्रॉननंतर आता कोरोनाच्या आणखी एका व्हेरिएंटचा शोध Saam Tv
देश विदेश

Corona Update : सावधान! ओमिक्रॉननंतर कोरोनाच्या आणखी एका व्हेरिएंटचा शोध

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : जगात आणि देशात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चाललं आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा (Omicron Variant) धोकाही वाढतोय. त्यातच आता आणखी एक चिंता वाढवणारी बातमी पुढे आली आहे. ओमिक्रॉननंतर आता कोरोनाच्या आणखी एका व्हेरिएंटचा (Variant IHU) शोध लावण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या Variant IHU ने तब्बल 46 वेळा म्युटेशन केलं आहे. मूळ कोव्हिड विषाणूपेक्षा हा व्हेरिएंट अधिक लस प्रतिरोधक आणि संसर्गजन्य असू शकतो, असं मानलं जात आहे. (After Omicron COVID New Variant Found In France Variant IHU With 46 Mutations)

फ्रान्सने लावला Variant IHU चा शोध

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, Variant IHU चा शोध हा फ्रान्स (France) मध्ये लागला आहे. फ्रान्सच्या मारसैल येथे Variant IHU चे 12 रुग्ण आढळून आले आहेत. आफ्रिकेतून आलेल्या लोकांमध्ये हा व्हेरिएंट आढळून आला आहे.

फ्रान्समध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटची दहशत

Variant IHU हा किती घातक आहे आणि याचं संक्रमण किती होईल याबाबत सध्या काहीही माहिती नाही. सध्या फ्रान्समध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) ची दहशत पाहायला मिळत आहे. येथील एकूण रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण हे ओमिक्रॉनचे आहेत. या व्हेरिएंटला Méditerranée Infection Foundation ने 10 डिसेंबरला शोध लावला होता. सध्या या व्हेरिएंटचा प्रसार अत्यंत कमी प्रमाणात होत आहे.

हेही वाचा -

नवीन व्हेरिएंट शोधणार्‍या टीमचे प्रमुख प्रोफेसर फिलिप कोल्सन म्हणाले की, चाचणीमध्ये असे आढळून आले की, ते E484K म्यूटेशनने बनलेले आहे. ज्यामुळे तो अधिक लस प्रतिरोधक बनते. म्हणजे लसीचा त्यावर परिणाम होईल याची शक्यता कमी असते.

देशात 24 तासात कोरोनाचे 37,379 नवीन रुग्ण

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 37,379 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर, 11,007 जण कोरोनातून बरे झाले आहेत. यादरम्यान, 124 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, जो सोमवारच्या तुलनेत अधिक आहे. सोमवारी 123 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटप्रमाणेच ओमिक्रॉन हा नवा व्हेरिएंटही वेगाने पसरत आहे. आतापर्यंत, देशातील ओमिक्रॉन रुग्णांची एकूण संख्या 1,892 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमिक्रॉनची सर्वाधिक 568 आणि 382 प्रकरणे नोंदली गेली आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ओमिक्रॉनच्या 1,892 रुग्णांपैकी 766 बरे झाले आहेत.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

50MP Sony IMX882 कॅमेरा, 5500mAh बॅटरी; या दिवशी भारतात लॉन्च होणार Realme GT 6T स्मार्टफोन

Bathing Tips: आंघोळ करताना या चुका टाळा, नाहीतर...

Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील २४ तासांत वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता; पुणे, मुंबई, ठाणे, पालघरवर अवकाळीचं संकट कायम

PM Modi: पंतप्रधान मोदी आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार, वारासणीमधून निवडणूक लढवणार

Ghatkopar Hording Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर; ४३ जणांवर उपचार सुरू, रात्रभर बचावकार्य

SCROLL FOR NEXT