Defence Minister Rajnath Singh Saam Tv
देश विदेश

महात्मा गांधीजींनंतर नरेंद्र मोदीच भारतीयांना समजून घेतात: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

राष्ट्रपतींचे प्रेस सचिव अजय सिंग यांच्या 'द आर्किटेक्ट ऑफ द न्यू बीजेपी: हाऊ नरेंद्र मोदी ट्रान्सफॉर्म्ड द पार्टी' या पुस्तकाचे प्रकाशन काल झाले.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: महात्मा गांधींनंतर भारतीय जनतेचे मन समजून घेणारे कोणी असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) आहेत, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. “मोदीजींनीच भाजपला सर्व पंथीयांनी जात आणि समुदायाच्या सीमा तोडून स्वीकारायला लावले. त्यांनी एक असे मॉडेल तयार केले आहे ज्याला कोणही तोडू शकत नाही. स्वतंत्र भारतात तुमच्याकडे असा दुसरा नेता नाही ज्याने त्यांना दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या असतील. भाजपने २०१४ नंतर जे काही वैभव प्राप्त केले आहे, त्यात शंका नाही. हे मोदीजींमुळेच झाले आहे, असंही राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले.

राष्ट्रपतींचे प्रेस सचिव अजय सिंग यांच्या 'द आर्किटेक्ट ऑफ द न्यू बीजेपी: हाऊ नरेंद्र मोदी ट्रान्सफॉर्म्ड द पार्टी' या पुस्तकाचे प्रकाशन काल झाले. या प्रकाशन सोहळ्यात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते, यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले, “महात्मा गांधींनंतर भारतातील लोकांची मने समजून घेणारा एखादा नेता असेल तर ते मोदीजी आहेत. त्यांना लोकांच्या भावना आणि त्यांच्या समस्या समजतात. या कार्यक्रमात उपस्थित असलेले राज्यसभेचे उपसभापती हरिवंशही उपस्थित होते. यावेळी बोलताना हरिवंश म्हणाले, 'मोदी (Pm Narendra Modi) हे जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rave Party : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, खडसेंच्या जावायाचा अल्कहोल रिपोर्ट समोर

Maharashtra Live News Update: उद्या दुपारी होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Crime: तिला मारून टाक, तुझं दुसरं लग्न करू; सोशल मीडियावर VIDEO पोस्ट करत पोलिसाच्या बायकोची आत्महत्या

Farmer Success Story : लातूरच्या मातीत विदेशी फळ; शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी, वर्षाकाठी घेताय एकरी १२ लाखाचे उत्पादन

Family Relations: घरी आलेल्या नातेवाईकांसमोर 'या' 4 चुका टाळा, घरचे वातावरण राहील आनंदी

SCROLL FOR NEXT