काळजी घ्या! चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा हाहाकार, जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक बाजारपेठ बंद

चीनमधील शेनझेनमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांनंतर पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
China Corona
China CoronaSaam Tv
Published On

Covid-19 Lockdown in China: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे (Corona) रुग्ण वाढू लागले आहेत. सतत वाढत असलेल्या रुग्णांमुळे शेन्झेन येथील हुआकियांगबेई येथे असलेल्या जगातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स रिटेल मार्केटमध्ये ४ दिवसांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

तसेच अनेक निर्बंधही लादण्यात आले आहेत. अनेक भागात शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत. या भागात पुन्हा एकदा तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे. कोरोनाबाधित (Corona) रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची चौकशी केली जात आहे.

China Corona
Petrol Diesel: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीतून मोठा दिलासा! जाणून घ्या आजचे दर

कोरोनाचे (Corona) रुग्ण वाढल्यानंतर हुआकियांगबेईचे इलेक्ट्रॉनिक मार्केट बंद करण्यात आले आहे. हे जगातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक्स केंद्र मानले जाते. एवढेच नाही तर सरकारने आपत्कालीन सेवा वगळता सर्व काही बंद केले आहे. लुओहूमध्ये, गुइयुआन, नान्हू आणि सुंगांग उपजिल्ह्यांमध्येही संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. रेस्टॉरंटमध्ये फक्त जेवण घरी नेण्याची परवानगी आहे.

मार्चनंतर शेनझेनमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. सोमवारी कोरोनाचे ११ रुग्ण आढळले. यापूर्वीही सातत्याने रुग्ण समोर येत आहेत. यानंतर चीन सरकारने लॉकडाऊन लागू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com