Cough Syrup
Cough Syrup Saam TV
देश विदेश

Cough Syrup : कफ सिरप प्यायल्याने १८ बालकांचा मृत्यू?; गांबियानंतर उजबेकिस्तानचा दावा

साम टिव्ही ब्युरो

Cough Syrup Latest News : भारताच्या कंपनीने तयार केलेले कफ सिरप प्यायल्याने १८ बालकांचा मृत्यू झाल्याचा दावा उजबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे. भारताच्या मेरियन बायोटेक या कंपनीने तयार केलेले डॉक १ मॅक्स सिरप बालकांना दिल्याचा दावा मंत्रालयाने केला आहे. (Latest Cough Syrup News)

मीडिया रिपोर्टनुसार, उजबेकिस्तानच्या समरकंद शहरात ही घटना घडली, असे सांगण्यात येत आहे. मेरियन बायोटेक या कंपनीची नोंदणी २०१२ मध्ये उजबेकिस्तानमध्ये करण्यात आली होती. त्याच वर्षी औषधांची विक्री ही सुरू झाली होती. स्थानिक मीडियाच्या दाव्यानुसार प्रयोगशाळेत चाचणी दरम्यान एथिथील ग्लायकॉल हे केमिकल त्यात आढळले होते. याच केमिकलमुळे हरियाणाची मेडन फार्माही चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे.

ऑक्टोबरमध्ये आफ्रिकन देश गांबियानेही असाच आरोप केला होता. मेडन फार्मा या कंपनीनं तयार केलेले कफ सिरप प्यायल्याने त्यांच्या इथे बालकांचा मृत्यू झाला होता. जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत चिंता व्यक्त केली होती. या घटनेची दखल घेत केंद्र सरकारनेही चौकशीसाठी एका समितीची स्थापना केली होती. मात्र, त्यानंतर यासंदर्भात केंद्र सरकारने क्लीन चीट दिली होती.

डाइएथिलीन ग्लायकॉल आणि एथिनील ग्लायकॉल हे चवीला गोड मात्र, खूपच विषारी रंगहीन द्रव आहे. सर्वसाधारणपणे ग्लिसरीनमध्ये दूषित पदार्थांप्रमाणे ते मिसळले जाते. ग्लिसरीनचा वापर अनेक सिरप तयार करण्यासाठी स्वीटनरसारखा वापर केला जातो.

गांबियामध्ये झालेल्या मृत्यूंचा संबंध जागतिक आरोग्य संघटनेने भारतामध्ये (India) तयार केलेल्या कफ सिरपशी जोडला होता. भारताच्या औषध (medicine) महानियंत्रकांनी याबाबत याच महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेला पत्रही लिहिले होते. DCGI ने पत्रात तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. गांबियामध्ये बालकांच्या मृत्यू प्रकरणाचा संबंध भारतात तयार केलेल्या चार कफ सिरफशी जोडल्याने जगभरात देशातील औषध उत्पादकांच्या प्रतिमेवर प्रतिकूल परिणाम झाला. या चारही कफ सिरपचे नमुने सरकारी प्रयोगशाळांमध्ये तपासण्यात आले आणि ते नियमांनुसारच असल्याचे आढळून आल्याचे औषध महानियंत्रकांनी पत्रात म्हटले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

Arunachal Pradesh: फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, मग एकदा अरुणाचल प्रदेशला भेट द्या

CSK Vs SRH : चेन्नईच्या बॉलर्सची 'सुपर' बॉलिंग; हैदराबादचा १३४ धावांवर उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT